नागपूर – शासकीय कामासाठी कार्यालयात कामासाठी विना हेल्मेट (Without Helmet) येणाऱ्यांवरती आजपासून कारवाई करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आले आहे. अनेकदा झालेल्या अपघातात विना हेल्मेट असल्यामुळे मोटार सायकल चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हेल्मेट सक्ती कडक करण्यात येणार आहे. नागपूरमध्ये (Nagpur) विना हेल्मेट सरकारी बाबूंवर आजपासून होणार कारवाई करणार असल्याचे संकेत आरटीओ विभागाकडून (Nagpur RTO Office) देण्यात आले आहेत. नागपूर जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात आजपासून हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे. नागपूर आरटीओ सरकारी कार्यालयात तपासणी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सरकारी कार्यालयात विना हेल्मेट असलेल्या दुचाकी चालकावर होणार सु्ध्दा कारवाई करण्यात येणार आहे. नागपूरात हेल्मेट सक्तीच्या अंमलबजावणीची सुरुवात सरकारी कार्लायलयातून होणार आहे. ही कारवाई राज्याच्या परिवहन आयुक्तांच्या आदेशानुसार होणार करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात दररोज कितीतरी अपघात होत असतात. मोटार सायकलमध्ये चालकाचा अनेकदा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळतं. परंतु त्याचा मृत्यू हा हेल्मेट नसल्यामुळे झाल्याचा अनेकदा निदर्शनास आलं आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या परिवहन आयुक्तांनी हेल्मट सक्तीचं पत्र काढलं आहे. त्यांची अंमलबजावणी आजपासून नागपूरात करण्यात येणार आहे. पहिल्यांदा सरकारी कार्यालयाता कामासाठी विना हेल्मेट येणाऱ्या लोकांवरती कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सरकारी कर्मचारी विना हेल्मेट कार्यालयात आल्यास त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे नागपूर आरटीओ अधिकाऱ्यांनी संकेत दिले आहेत. आरटीओच्या अधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक अंमलबजावणी मोहीम करावी असं पत्रात म्हटलं आहे.
जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हेल्मेट वापरासंबंधी नागरिकांना प्रबोधन करावे. सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय नागरिकांना सहभागी करून घ्यावे. प्रबोधन केल्यानंतर सुध्दा विना हेल्मेट अधिकारी कर्मचारी किंवा नागरिक निर्दशनास आल्यास त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी असा पत्रात उल्लेख केला आहे.