नागपूर : नागपूरच्या जरीपटका भागातील अवनी ज्वेलर्सवर टाकलेल्या दरोड्यातील दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशात अटक केली आहे, तर दोन दरोडेखोर अद्यापही फरार आहेत. एका युवतीने आपल्या बॉयफ्रेंडच्या मदतीने दरोडेखोरांना अवनी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याची टिप दिली होती. चारही दरोडेखोर उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती आहे. (Nagpur Avani Jewelers Robbery two arrested from Madhya Pradesh)
बंदुकीच्या धाकाने दुकानदाराला ओलीस धरत सोन्या चांदीच्या दुकानात दरोडा टाकल्याचा प्रकार नागपुरात काल भरदिवसा घडला होता. चार आरोपींनी दरोडा टाकत दुकानदाराला बांधून मारहाण केली. त्यानंतर 4 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन आरोपी पसार झाले होते. दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशात अटक केली आहे, तर दोन दरोडेखोर अद्यापही फरार आहेत.
नेमकं काय घडलं?
दरोडेखोरांपैकी एक जण ग्राहक बनून दुकानात आला. थोड्या वेळात दुसऱ्याने दुकानात प्रवेश करत दुकानदारावर बंदूक धरली. त्यानंतर तिसऱ्याने दुकानात प्रवेश करत शटर बंद केलं. दुकानदाराचे हात पाय बांधून त्याला मारहाण केली. तर इतरांनी दुकानात असलेली चार लाख रुपयांची कॅश आणि सोन्या चांदीचे दागिने लुटले.
यावेळी एक जण बाहेर पाळत ठेऊन होता. दुकानदार दुकानात एकटाच असल्याने तो काहीही करु शकला नाही. भर वस्तीतील अगदी रस्त्यावर असलेलं दुकान दरोडेखोर लुटत होते मात्र बाहेरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्याची कल्पनाही आली नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर बाबींचा आधार घेत आरोपींचा शोध सुरु केला.
संबंधित बातम्या :
नागपुरात भर दिवसा सोन्या-चांदीच्या दुकानात दरोडा, 4 लाखांची रोकड आणि दागिने लंपास
दहिसर साईराज ज्वेलर्स लूट आणि हत्या, मुख्य आरोपीला मध्य प्रदेशातून अटक, सात जणांना बेड्या
(Nagpur Avani Jewelers Robbery two arrested from Madhya Pradesh)