नागपूर : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न असलेल्या बीएसी नर्सिंग करणाऱ्या मुलींच्या वसतिगृह खळबळजनक घटना समोर आली. वसतिगृह परिसरात एक अज्ञात युवक मध्यरात्री दोन ते तीन वाजताच्या सुमारास फिरतो. वसतिगृहाच्या खोल्यांचे दार वाजवून मुलींना घाबरवत असतो. काही मुलींनी धाडसाने याचे चित्रीकरण केले. त्यात 25 ते 30 वयोगटाला हा तरुण असल्याचे दिसून येते. विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनाकडे याची तक्रार दिली. आतापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही. येथे शिक्षणाच्या मुलींच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा व्हिडीओ शूट केल्याची घटना दोन फेब्रुवारीची आहे. घटनेची लेखी तक्रार विद्यार्थिनींनी कॉलेजच्या प्राचार्यांकडे दिली. त्यानंतर वसतिगृह परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच घटनेच्या दिवशी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्यात आली.
विद्यार्थिनींनी मोठ्या हिमतीने हा व्हिडीओ काढला. ही वेळ मध्यरात्रीची आहे. व्हिडीओत २५ ते ३० वर्षांत युवक माघारी फिरत आहे. विद्यार्थिनी त्याला विचारत आहेत. भय्या कहाका हैं. इधर कहा आला. मी चुकून आल्याचे तो सांगतो. पण, परत फिरून पाहत नाही. सुरक्षा रक्षकही जागा होता. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत तो पसार होता. घाईघाईने पळून जातो.
मेडिकल परिसर मोठा आहे. या परिसरात नर्सिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या मुली राहतात. या मुलींच्या वसतिगृहासमोर हा प्रकार घडला. रात्री दोन -तीन वाजता हा युवक आला होता. त्यामुळे तो तिथं कशासाठी आला. कुणाला भेटायला तर आला नव्हता. मुलींना भीती तर दाखवायची नव्हती. असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तक्रार करण्यात आली आहे. पण, अद्याप त्या युवकाचा शोध लागलेला नाही. या घटनेपासून विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या वसतिगृहात मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी राहतात.