नागपूर : नागपुरातील कुख्यात गुंड आणि मोक्काचा आरोपी (Mocca Accused) अब्बू खान आणि त्याच्या तीन भावांवर नागपूर पोलिसां (Nagpur Police)नी जोरदार कारवाई करत त्यांना अटक केली. तसेच या तिघांच्या आलिशान घरांची झडतीही घेतली. पोलिसांनी वेगवेगळे पथक बनवून झडती घेतली. याआधीही नागपुरात पोलिसांनी मोठ मोठ्या गुंडांवर कारवाई करत त्यांची विना परवाना असलेली घरे पाडली होती. तसेच संपत्तीही जप्त केली होती. या कारवाईत आता पोलिसांच्या हाती काय लागते आणि काय कारवाई होते याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. (Nagpur police cracks down on property of notorious goons and Mocca accused)
नागपुरातील कुख्यात गुंड अब्बू खान आणि त्याचे तीन भाऊ सुद्धा गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. चारही भावांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर त्याच्या दोन भावांनाही अटक करण्यात आली. याची चौकशी केली असता यांचे आलिशान घर आणि संपत्तीचा हिशोब यांच्याकडे मागण्यात आला. मात्र ते देऊ शकले नाही म्हणून पोलिसांनी वेगवेगळ्या चार टीम तयार करत त्यांच्या आलिशान घरांची झडती सुरू केली आणि यांच्या संपत्तीचा हिशोब सुरू केला. यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली याचा सुद्धा पोलिसांनी शोध सुरू केला असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आला होता.
भिवंडी शहरातील 72 गाळा वसई रोड या परिसरात पहाटेच्या सुमारास 84 ग्रॅम एमडी पावडर, गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसांसह दोघांच्या भोईवाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हरिष राकेश सिंग (30), आफताब अन्वर शेख (35) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. यापैकी हरिष राकेश सिंग याच्यावर 19 गुन्हे दाखल असून त्यापैकी 6 गुन्ह्यात तो फरार आहे. यामध्ये ज्वेलर्स दुकानदारावर गोळीबार करून दरोडा, पोलीस अधिकाऱ्यावर गोळीबार करून पलायन करणे, दरोडे, जबरी चोरी अशा गुन्ह्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Nagpur police cracks down on property of notorious goons and Mocca accused)
इतर बातम्या
Bhiwandi Crime : भिवंडीत एमडी पावडरसह दोघांना अटक, गावठी कट्ट्यासह जिवंत काडतूसही हस्तगत
Wardha Youth Death : पॅरासिटामॉलच्या गोळ्यांचा ओव्हरडोज, वर्ध्यात युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू