नागपूर : मोबाईल (Mobile Phone) हा आता प्रत्येकाचा अविभाज्य घटक आहे. मात्र हा मोबाईल हरवला तर अनेकांना अस्वस्थ वाटतं, साहजिक आजकालच्या मोबाईलच्या किंमती आणि मोबाईलची सवय, यामुळे हे वाटणं साहजिक आहे. मात्र एकाद हरवलेला मोबाईल सापडणं हे क्वचितच शक्य होतं. पण तो सापडला तर ज्याचा मोबाईल आहे त्याच्या आनंदाला पारावार उतर नाही. नागपूर पोलिसांनी हाच अनुभव अनेक जणांना करून दिला आहे. नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी (Nagpur Police) हरवलेले मोबाईल शोधून काढले आहेत. आणि ते नागरिकांना परत केले आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. या कामगिरीमुळे नागपूर पोलिसांचे कौतुकही होत आहे. मात्र त्याचबरोबर गेल्या अनेक दिवसात नागपूर शहरात मोबाईल चोरांचा (Nagpur Crime) सुळसुळाट उटला आहे. तेही रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
नागपूरच्या जरीपटका पोलिसांनी नागरिकांशी जवळीक आणि त्यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे या भागातल्या नागरिकांनाही पोलिसांवर चांगलाच विश्वास आहे. हा प्रसंग अतिशय आनंद देणारा असल्याचे यावेळी तक्रारदारांनी सांगितले. पोलिसांनी एकूण 12 हरवलेले आणि चोरी गेलेले मोबाईल शोधले. यातले सगळे मोबाईल हे महागडे होते , ज्यांचे मोबाईल हरवले त्यांनी ते परत मिळतील याची अपेक्षा सोडली होती. मात्र आता आपला मोबाईल मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. या कामगिरीमुळे या भागातील नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी वाढला आहे. आपल्या कर्तव्याला कटीबद्ध राहून कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांमुळे आम्हाला पूर्णण सुरक्षित वाटत असल्याचेही स्थानिक सांगतात.
आम्ही यावेळी या ठिकाणाच्या लोकांच्या आणि पोलिसांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तक्रारदारांचे मोबाईल परत करणाऱ्या पोलिसांनी सांगितले, पोलिसांकडे तक्रार आली की ते त्याचा शोध घेतात. कधी यश मिळते तर कधी मिळत नाही. मात्र प्रयत्न नियमित सुरू असतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर 12 जणांना त्यांचे हरवलेले मोबाईल मिळाले याचा आनंद तर याना झालाच पण त्यांनी पोलिसांचे आभार सुद्धा मानले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मी गेल्या वर्षी मोबाईल हरल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर आज एका वर्षानंतर मला माझा मोबाईल परत केला, त्यामुळे पोलिसांचे मी आभार मानते अशी प्रतिक्रिया एका तरुणीने दिली. या कामगिरीनंतर पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.