नागपूर : साक्षी आणि राधिका, या दोघी सख्ख्या बहिणी. वय अनुक्रमे सहा आणि तीन वर्ष. पण दोघांचाही अचानक मृत्यू झाला. एकाच दिवशी सख्ख्या बहिणींच्या मृत्यूनं नागपूर (Nagpur Crime News) हादरलंय. या मुलींच्या नातलगांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आधी राधिकाला कसंतरी वाटू लागलं. तिला खोकला आला. अंग गरम लागलं. प्रकृती खालावतेय, असं वाटू लागल्यानं घरातले आणि शेजारी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. पण तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. त्यानंतर लगेचच साक्षीलाही अस्वस्थ वाटू लागलं. तिलाही रुग्णालयात घेऊन जात होते. पण नागपुरात (Nagpur Suspicious Death) रुग्णालयात नेत असताना वाटेत तिचाही जीव गेला. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते. दोन्ही मुलींच्या संशयास्पद मृत्यूमागचं नेमकं कारण काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या दोन सख्ख्या बहिणींच्या (Nagpur Sisters Death) मृत्यूप्रकरणी पोलिसांकडूनही तपास केला जातोय.
अवघ्या सहा आणि तीन वर्षांच्या सख्ख्या बहिणींच्या मृत्यूने नागपूर जिल्हा हादरलाय. या दोघींच्या मृत्यूवरुन तर्कवितर्कांना उधाण आलंय. नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगी येथील ही घटना आहे. अचानक या दोन्ही मुलींची तब्बेत बिघडली कशी? एकामागून एक दोघींचाही मृत्यू कसा झाला? डॉक्टरांकडे उपाचाराला नेण्याआधी त्यांचा मृत्यू होण्याचं कारण काय? या प्रश्नांनी दोघा सख्ख्या बहिणींच्या मृत्यूचं गूढ वाढवलं आहे.
साक्षी फुलसिंह मीना ही सहा वर्षांही होती. तर तिची लहान सख्खी बहीण मीना ही तीन वर्षांची होती. आता या दोन्ही सख्ख्या बहिणींचे मृतदेह पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पोलीस आपल्या तपासाची दिशा अधिक स्पष्ट करु शकणार आहेत.
साक्षी आणि राधिका या दोघीही राजस्थानात असतात. त्या आपल्या आईसोबत नागपुरात आल्या होत्या. आपल्या चुलत बहिणीसोबत साक्षी राधिका आणि त्यांची आई आजीकडे भेट देण्यासाठी आले होते. आजोबांचं निधन झाल्यानंतर आजीला भेटण्यासाठी म्हणून आई आपल्या दोन मुलींना राजस्थानहून नागपूर घेऊन आली होती. पण त्याआधीच ही हारवणारा घटना समोर आली आहे.
साक्षी आणि राधिका यांना विषबाधा झाली होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत. तसंच दोघींचाही व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. आता फॉरेन्सिंक टीमची मदत पोलिसांकडून या दोघींच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी घेतली जातेय.