नागपूर : यूपीएससी (UPSC Exam) परीक्षेत एकदा दोनदा नव्हे, तर तीन वेळा अपयश आल्यानं एक तरुण खचला आणि त्यानं आपलं आयुष्य संपवलं. ही धक्कादायक घटना नागपुरात घडली. नागपुरात (Nagpur Suicide News) तरुणानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय. यूपीएससी परीक्षेत तीन वेळा या तरुणाला अपयश आलं. माझे प्रयत्न अपुरे पडत आहेत, असं म्हणत या तरुणानं आपली जीवनयात्रा संपवली. जरीपटका पोलीस (Nagpur News) स्टेशनच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडलीय. ब्लेसन चाको असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नावय. रविवारी पंख्याला चादर बांधून त्यांने गळफास घेतला आणि आपलं आयुष्य संपवलंय. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातेय.
गेल्या आठवड्यामध्ये यूपीएससी सिविल सेवा परीक्षेचा निकाल लागला होता. या निकालात 28 वर्षांच्या ब्लेसन चाको याला यश मिळवता आलं नव्हतं. तिसऱ्यांदा यूपीएससी अटेम्ट करणाऱ्या जरीफटका इथं राहणाऱ्या ब्लेसनला या निकालाने मोठा धक्का दिला. सोमवारी संध्याकाळी निराशेने ग्रासलेल्या या तरुणानं सिलिंग फॅनला गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.
रविवारी या तरुणानं पंख्याला चादर बांधून गळफास लावून घेतला आणि जीव दिला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. जरीपटका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी या घटनेबद्दल माहिती दिली. राहत्या घरात या तरुण मुलानं जीव दिल्यानं त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसलाय. घरातील पंख्याला लटकून या मुलानं आत्महत्या केली. घरात या मुलाचं पंख्याला लटकलेलं शव पाहून सगळेच हादरले होते. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन घेतली असून अधिक तपास आता केला जातोय.
यूपीएससी परीक्षेसाठी मुलं प्रचंड मेहनत घेत असतात. पण अनेकांना या परीक्षेत यश संपादीत करता येत नाही. पण म्हणून टोकाचं पाऊल उचलत आत्महत्येसारखा निर्णय घेण्याचा विचार मनात आणणंही चूक आहे. मुलांनी खचून न जाता आयुष्यातील कठीण प्रसंगांना स्वीकारून पुढे गेलं पाहिजे. संकटांवर मात करत संघर्ष करण्याला पर्याय नाही, हेही समजून घेतलं पाहिजे. तसंच कोणत्याही परीक्षेत आलेल्या अपयशाने खचून न जाता, नेहमी नव्या जोमाने सुरुवात करायला हवी.