नागपूर : नागपुरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीचा पगार जास्त असावा, अशी अपेक्षा कोणत्या तरुणीला वाटत नसेल? पण सगळ्याच तरुणींना भरमसाठ पगाराचा नवरा मिळतोच असं नाही! मात्र नागपुरात (Nagpur Suicide) एका उच्चशिक्षित तरुणीचं गरीब घरात लग्न लावून दिल्यामुळे तिला नैराश्य आलं. आपल्या नवऱ्याचा पगार अवघा सहा हजार असल्याचं नववधूला कळल्यानंतर महिन्याभरातच या तरुणीला नैराश्य येऊन तिनं गळफास (Newly married highly educated bride suicide) घेतलाय. या घटनेनं सगळेच हादरुन गेलेत. टोकाचं पाऊल उचललेल्या या तरुणीचं डिसेंबर महिन्याच्या अखेरीस लग्न झालं होतं. पण या तरुणीनं घरी कुणी नाही, हे बघून अखेर गळफास लावून घेत स्वतःचं आयुष्य संपवलंय. दरम्यान, यानंतर पोलिसांना तपास करताना एक सुसाईड नोट (Suicide Note) सापडली. या सुसाईड नोटमध्ये उच्चशिक्षित नववधून आपल्या आत्महत्येचं कारणही सांगितलंय.
तो दिवस होता 29 डिसेंबर 2021! अश्विनी आणि हरिदास यांचं थाटामाटात लग्न झालं. गरीब घरातला हरिदास झेडपी शाळे शिक्षक. तर मुलगी आणि तिच्या कुटुंबातील सगळेच उच्चशिक्षित आणि नोकरीला. आपल्या मैत्रिणींप्रमाणे आपलंही लग्न मोठ्या कुटुंबात व्हावं, अशी अश्विनीला अपेक्षा होता. पण तसं झालं नाही.
लग्नानंतर हरिदास आणि अश्विनी जलालखेडा इथं राहायला आले. भाड्याच्या घरात नवदाम्पत्य आणि त्यांची आजी सोबत राहत होती. हरिसाद रोज वाढोणामधल्या शाळेत शिकवायला जायचा. घरी आजी आणि नववधू अश्विनीच असायचे. आपलं लग्न गरीब घरात झालं, म्हणून दुःखी असलेली अश्विनी दिवसभर विचारांनी थकून जायची. यातच तिला नैराश्य आली.
आजी घरी असल्यामुळे करायचं काय, असा प्रश्न अश्विनीला पडला होता. दरम्यान, 31 जानेवारीच्या रविवारी आजी परत गावी गेली होती. त्यानंतरअश्विनीनं अखेर गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. यानंतर पोलिसांनी घरी तपास केला असता, एका डायरी सापडली. या डायरीमध्ये धक्कादायक बाबींमध्ये सगळ्यांना हादरवलं.
अश्विनीच्या डायरीत धक्कादायक बाबी लिहिल्याचं पोलिस तपासातून समोर आलंय. साक्षगंध झालेला दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात काळा दिवस होता, असं अश्विनीनं आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय. माझं एका गरीब कुटुंबात लग्न लावून देण्यात आलं. माझ्य सर्व मित्र मैत्रिणी माझ्या गरीब असल्या तरी त्याचं लग्न श्रीमंत घरात लावलं गेलं. त्यांचा उच्चशिक्षित नवरा मुलगा मिळाला. पण माझा अख्खा परिवार उच्चशिक्षित असला, तरी माझं लग्न गरीब घरात लावण्यात आलं, असं अश्निनीच्या सुसाईड नोटमध्ये लिहिल्याचं आढळलंय.
अश्विनीचा पती हरिदाससह अश्विनीचे कुटुंबीय या घटनेनं हादरुन गेले आहेत. 2020 मध्ये हरिदासला सरकारी नोकरी लागली होती. तीन वर्ष तो शिक्षक म्हणून काम करतोय. त्याला सहा हजार मानधन मिळतंय. पतीच्या मृत्यूचं कारण आपली गरिबी असल्याचं कळल्यानंतर हरिदासच्याही पायाखालची जमीन सरकली आहे.
मुलींची छेडछाड रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून मुख्याध्यापकांवर जीवघेणा हल्ला! औरंगाबादेत खळबळ
गणेशशी खोटं बोलून त्यांचं खोटं खोटं लग्न लावलं! सोनं, चांदी आणि रोख रक्कम घेत गणेशला लुटलं!