नवविवाहित दाम्पत्य कामाच्या शोधात जात होते, पतीला दारू पाजली, पत्नीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

| Updated on: Oct 30, 2022 | 9:15 PM

काही अंतर पुढे जात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

नवविवाहित दाम्पत्य कामाच्या शोधात जात होते, पतीला दारू पाजली, पत्नीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
पत्नीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : नव्यानेच लग्न झालेले मध्यप्रदेशमधील एक जोडपं कामाच्या शोधत नाशिककडे निघालं. मात्र ट्रकने जात असताना ट्रक चालक आणि क्लिनरने पतीला दारू पाजली. ट्रक खाली उतरविले. महिलेला घेऊन निघाले. रस्त्यात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने ट्रकमधून उडी घेतली. नागपूर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आरोपींना अटक करण्यात आली.

एखाद्या हिंदी सिनेमाच्या कथानकातील असावी अशी घटना नागपूरजवळ घडली. मध्यप्रदेशमधील हरदा जिल्ह्यातील एक नवविवाहित जोडपं कामाच्या शोधात नाशिककडे निघालं. रस्त्यात एक ट्रक मिळाला. त्यात ते बसले. ट्रक आधी नागपूरला येऊन मग नाशिकला जाणार होता.

ट्रक चालकाने नागपूरमध्ये काही सामान खाली केलं. नंतर ट्रक एका ठिकाणी जेवणासाठी थांबविला. चालक आणि क्लिनरने दारू प्याली. महिलेच्या पतीला सुद्धा दारू पाजली. त्याला खालीच सोडले. महिलेसह ट्रक घेऊन पुढे निघाले.

काही अंतर पुढे जात महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीला जिथे सोडलं त्याठिकाणी काही सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांना पतीने घटना सांगताच त्यांनी पोलिसांना कळविले. ट्रकचा पाठलाग केला. तिकडे महिलेने ट्रकमधून उडी मारत आपली सुटका केली.

पोलिसांनी नाकेबंदी करत दोन्ही आरोपींना अटक केली. अशी माहिती एसीपी अशोक बागुल यांनी दिली.
वेळेत मिळालेली मदत सामाजिक कार्यकर्त्यांची सतर्कता आणि महिलेने दाखविलेलं धाडस यामुळे मोठी घटना टळली नाहीतर अनर्थ घडला असता.

ही घटना अतिशय गंभीर आहे. प्रवास करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. आपण कुणासोबत जातो, याची पारख केली पाहिजे. जशी संगती राहील, तसचं घडतं. म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे.