सुनील ढगे, नागपूर : काँग्रेसचे माजी माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांच्या विरोधात ताजबाग ट्रस्टमध्ये अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. शेख हुसेन यांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यानंतर चांगलेच प्रकाश झोतात आले होते.
शेख हुसेन हे ताजबाग येथील हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टमध्ये अध्यक्ष होते. त्या काळात ट्रस्टमध्ये कोट्यवधी रुपयाचा अपहार केल्याची तक्रार विद्यमान सचिव यांनी दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास केला. त्यामध्ये काही तथ्य आढळून आले.
शेख हुसेन यांच्यावर आणि तत्कालीन सचिव इकबाल इस्माईल बेलजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सक्करदरा पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशी माहिती सक्करदार पोलीस ठाण्याचे धनंजय पाटील यांनी दिली.
नागपुरातील मोठा ताजबाग हे हिंदू आणि मुस्लीम धर्मियांचा श्रद्धा स्थान आहे. याच ट्रस्ट मध्ये 2011 ते 2016 या काळात शेख हुसेन हे अध्यक्ष होते. या काळात अपहार झाल्याचं पुढे येत आहे. त्यामुळं शेख हुसेन यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं दिसून येते.
2021 ला नवीन ट्रस्टी झालेत. त्यांनी सुरुवातीच्या झालेल्या कामाचं ऑडीट केलं.त्यामध्ये त्यांनी गैरव्यवहार झाल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली. 2011 ते 2016 पर्यंतचं हे प्रकरण आहे. ट्रस्ट 2001 पासून नेमण्यात आलंय. 1 कोटी 59 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्यांच ऑडीट रिपोर्टमध्ये समोर आलंय.