आरटीओ, पोलिस, उत्पादन शुल्क विभागाची गाड्यांवर दंडात्मक कारवाई, लोकांची मात्र वेगळीचं चर्चा

| Updated on: Jul 09, 2023 | 12:13 PM

समृध्दी महामार्गावर अपघात झाल्यापासून पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. दंडात्मक कारवाईमुळे खासगी ट्र्रॅव्हल्स चालक घाबरले आहेत.

आरटीओ, पोलिस, उत्पादन शुल्क विभागाची गाड्यांवर दंडात्मक कारवाई, लोकांची मात्र वेगळीचं चर्चा
buldhana travels
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बुलढाणा : आरटीओ, पोलिस, उत्पादन शुल्क विभागाची धडक मोहीम सुरु झाल्यापासून खाजगी ट्रॅव्हल्सची (Private travels) कसून तापासणी तपासणी करण्यात येत आहे. अनेक गाड्यांवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे चालकांसह मालक सुध्दा घाबरले आहेत. सगळ्या खासगी बसच्या (Police) मालकांना आणि चालकांना काटेकोरपणे नियम पालन करण्याचे आदेश दिले आहे. नियमांची पायमल्ली (buldhana RTO Action) करण्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर आता बुलढाणा जिल्हा आरटीओ विभाग, उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिस प्रशासन कारवाई करीत आहे. या तिन्ही विभागाकडून आता समृद्धी महामार्ग तसेच हायवेवर चालणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सची कसून तपासणी सुरू केली आहे.

त्यामध्ये चालक हा दारू पिलेला आहे का ? याची तपासणी सुरू आहे. चालक शेजारी केबिनमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना बसू न देणं, गाडीच्या आपत्कालीन दरवाजा व्यवस्थित आहे का ? अग्निरोधक यंत्र आहे की नाही, तसेच कागदपत्रांची तपासणी सुद्धा करण्यात येत आहेत. यावेळी काही गाड्यांची तपासणी केल्यानंतर अनेक गाड्यांवर दंडात्मक कारवाई शुद्ध करण्यात आली आहे. यामुळे खाजगी ट्रॅव्हल्स चालकांमध्ये आता खळबळ उडालीय.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी समृध्दी महामार्गावर अपघात झाला, त्यावेळी अनेक प्रवाशांचा जीव गेला आहे. गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धकडली. त्यानंतर पलटी झाली. ज्यावेळी गाडीला आग लागली, त्यावेळी प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यापैकी ज्या लोकांचा जीव वाचला, त्यांनी अपघात कसा झाला हे सुद्धा सांगितलं. त्याचबरोबर गाडीचा चालक दारु पिला होता