नागपूर : एका बाजूने नागपूर शहरात महिला दिन साजरा होत असतानाच, दुसऱ्या बाजूने चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना नागपुरात घडली. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीतील मिनीमातानगरात अमर आणि लतिका भारद्वाज हे दाम्पत्य राहतात. अमर भाजीपाला विक्री करायचा, तर मृतक लतिका ब्युटी पार्लरमध्ये काम करायची. दोघांनाही दोन मुली असून अमर हा संशयी स्वभावाचा आहे. ललितावर तो नेहमी संशय घ्यायचा त्यावरून अनेकदा त्यांच्यात वाद व्हायचे. काही वेळा तर वाद विकोपाला गेले होते. त्यामुळे दोघेही एकाच घरात वेगवेगळे राहायचे काही कामाने एक युवक लतिकाच्या घरी आला अमरने त्याला विरोध केला.
यावरून अमरचा आणि लतिकाचा वाद झाला. वाद इतका वाढला की अमरने लतिकाला घरात बोलवून तिच्यासोबत कडाक्याचे भांडण केले. तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. यात लतिकाचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या दाम्पत्याच्या दोन्ही मुलींवर आता एकटं राहण्याची वेळ आलीय. आईचा मृत्यू झाला असून वडिलांना देखील कारावास होण्याची शक्यता आहे. वडिलांच्या रागाच्या भरात या दोन मुलींच आता नुकसान होणार आहे.
सतत भांडणे होत असल्याने एकाच घरात हे पतीपत्नी वेगवेगळे राहत होते. मंगळवारी दुपारी प्लबिंगचे काम करण्यासाठी एक युवक आला. अमरने त्याला विरोध केला. यावरून अमरचा व लतिकाचे भांडण झाले. सणाचा दिवस असल्याने ललिकाने अधिक वाद न वाढविता शांत राहणे पसंत केले. दुसर्या दिवशी बुधवारी सकाळी तिने कळमना पोलीस ठाण्यात अमरविरोधात तक्रार केली. तक्रारीचा राग मनात ठेवून अमरने पत्नी लतिकाशी भांडण केले. तिच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. यात लतिका गंभीर जखमी झाली. तिचा घरातच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी अमरला अटक केली.