Nagpur Crime : पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, दोघे अद्याप फरार

| Updated on: Jul 22, 2022 | 12:01 AM

नागपूर ग्रामीण पोलिसांनी या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींचे दोन साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचाही कसून शोध घेत आहेत.

Nagpur Crime : पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, दोघे अद्याप फरार
पोलीस पथकावर हल्ला करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर : पोलीस पथकावर हल्ला (Attack) करणाऱ्या कंटेनर चालकासह एकाला नागपूर ग्रामीण पोलिसांनी गुजरातच्या गोध्रातून अटक (Arrest) केली आहे. कंटेनर चालक फ्लिपकार्टच्या गोडाऊनमध्ये सामानाची चोरी (Theft) करून कंटेनरमध्ये घेऊन जात होता. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी पोलीस पथकावर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. नागपूर ग्रामीण पोलिसांनी या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींचे दोन साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्यांचाही कसून शोध घेत आहेत. दरम्यान, या कंटेनरमध्ये काय काय सामान होते ? आरोपींनी या सामानाचे काय केले ? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

आरोपींनी कंटेनर पोलिसांच्या गाडीवर घालण्याचा प्रयत्न केला

काही दिवसांपूर्वी नागपूर ग्रामीण पोलिसांचे पथक गस्त घालत असताना एक संशयास्पद कंटेनर त्यांना दिसून आला. त्या कंटेनरमधून एक जण कुठला तरी बोरा खाली टाकताना पोलिसांच्या नजरेस पडला आणि पोलिसांनी त्या कंटेनरचा पाठलाग करायला सुरुवात केली. एक पोलीस कर्मचारी त्यांनी टाकलेला बोरा तपासात होता तर बाकिच्यांनी कंटेनरचा पाठलाग केला. जंगलाच्या ठिकाणी कंटेनर थांबला आणि पोलिसांची गाडी जवळ पोहोचताच त्याने आपला कंटेनर मागे घेत पोलिसांच्या गाडीवर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस सतर्कतेने गाडीच्या खाली उतरले त्यानंतर कंटेनरमधील दोघांनी पोलिसांवर हल्ला चढवला. त्यामध्ये एक कर्मचारी जखमी झाला आणि आरोपी कंटेनर घेऊन फरार झाले. पोलिसांनी यांचा शोध सुरू केला असता तो कंटेनर गुजरातमधील गोध्रा येथील असल्याचं निष्पन्न झालं. पोलीस पथकाने गुजरातमध्ये जाऊन उस्मानगणी कॉफीवाला आणि एका आरोपींला अटक केली तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. (Two arrested from Gujarat for attacking police team in Nagpur)

हे सुद्धा वाचा