गणेश सोनोने, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अकोला : देवी विसर्जन (Goddess Darshan) करण्याकरिता गेलेल्या युवकावर काळाने घाला घातला. गांधीग्राम येथून विसर्जन करून परत येत असताना अपघात (accident) झाला. या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाला. त्यानंतर संतप्त जमावाने चार चाकी वाहन पेटवून (Vehicle set on fire) दिले. नवरात्रीचे नऊ दिवस अगदी आनंदाने गेले. आज विसर्जनाच्या दिवशी अकोट फाईल परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अकोट फाईल परिसरात येत असलेल्या मच्छी मार्केट येथील मंडळाचे पदाधिकारी देवी विसर्जनासाठी गेले होते. देवीचे विसर्जन करून परतत असताना गांधीग्रामजवळ असलेल्या वल्लभ नगरजवळ अपघात झाला. समोरून येणाऱ्या क्रूझरने दुचाकीस जोरदार धडक दिली.
अकोट फाईल मच्छी मार्केट राहणारा 22 वर्षीय सूरज नंदाने याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या सूरज इंगळे व दिवे मेश्राम हे गंभीर जखमी झाले. हा अपघात घडताच संतप्त जमावाने अपघातात कारणीभूत असलेले वाहन पेटवून दिले.
या घटनेची माहिती मिळताच अकोट फाईल व दहिहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला स्वरूपच्या रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतक सूरज नंदाने हा घरातील एकुलता एक होता. तो खासगी नोकरी करीत होता. सूरज मनमिळाऊ असल्यानं सर्वात मिसळून राहत होता. सूरजच्या अचानक जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.