विवेक गावंडे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, यवतमाळ : भीषण अपघातातून (Road Accident) 25 मजूर अगदी थोडक्यात बचावले आहेत. मृत्यूला चकवा द्यावा, त्या प्रमाणे हे वाहनातून प्रवास करणाऱ्या सर्व मजुरांचा जीव बालंबाल बचावला. यवतमाळमध्ये एक भीषण (Yavatmal Accident News) अपघात. महिद्रा बोलेरो मॅक्स पिकअप वाहनातून मजूर जात होते. त्यावेळी त्यांची गाडी पुलावरुन थेट खाली कोसळले. यात बोलेरो (Mahindra Bolero Maxx Pickup) वाहन पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली होती. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा म्हणीचा प्रत्यय या अपघातातून बचावलेल्या मजुरांना आला. दरम्यान, एक जण मात्र या अपघातात ठार झाला
यवतमाळच्या बाभूळगाव जवळील नायगाव इथं अपघाताची ही घटना घडली. चंद्रपूरवरुन लाल बुलढाणा इथं बोलेरो मॅक्स पिकअप वाहनातून मजूर जाण्यासाठी निघाले होते. एमएच 28 बीआर 3831 क्रमांकाच्या बोलेरेमधून एकूण 25 मजूर प्रवास करत होते.
नायगाव जवळ असलेल्या एका पुलावरुन जात असतेवेळी चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बोलेरोने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहन पुलाचा कठडा तोडून खाली कोसळलं.
ही धडक इतकी भीषण होती, यात रस्त्यावर जाणाऱ्या एकाचा जीव गेला. अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचं नाव यदू जाधव असं आहे. दरम्यान, यानंतर पोलिसांनी स्थानिक मदतीने अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखवण्यासाठी बचावकार्य केलं. जखमींनावर सध्या यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
सुदैवानं या अपघातात, बोलेरोतून प्रवास करणाऱ्या कोणत्याही मजुराला गंभीर स्वरुपाची जखम झाली नाही. किरकोळ जखमी झालेल्या मजुरांचा या अपघातातून थोडक्यात जीव वाचलाय. पण त्यांच्या वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालंय.