यवतमाळ : गायीला वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅनला अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पिक अप गाडी उलटून झालेल्या अपघातात क्लीनर जखमी झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात (Yavatmal) ही अपघाताची घटना उघडकीस आली आहे. संबंधित पिक अप व्हॅन वरोऱ्याच्या दिशेने निघाली होती. वाटेत गाय आडवी आली, त्यावेळी गायीला धडकण्यापासून वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅन चालकाने जोरदार ब्रेक लावला, मात्र त्यामुळे ड्रायव्हरचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि पिक अप गाडी रस्त्याच्या दुभाजकावर चढून पलटी (Pick Up Van Accident) झाली. या अपघातात पिक अप व्हॅनचा वाहक जखमी झाला आहे, तर चालक सुखरुप आहे. या अपघातामुळे मोकाट गुरा-ढोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वणी-घुग्गुस मार्गावरील ब्राह्मणी फाट्या जवळून वरोराच्या दिशेने जाणारा पिकअप व्हॅनला अपघात झाला. गायीला वाचवताना व्हॅन पलटी झाल्यामुळे चा जखमी झाल्याची घटना घडली.
वणी-घुग्गुस मार्गावरून एम एच 34 ए व्ही 3135 हा पिकअप गाडी वरोऱ्याच्या दिशेने जात होती. यावेळी रस्त्यात गाय आडवी आल्याने तिला वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक लावला. दरम्यान चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि पिक अप रस्त्याच्या दुभाजकावर चढून पलटी झाली.
यात पिक अपमध्ये बसलेला वाहक जखमी झाला असून नागरिकांना त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, मात्र वाहन चालक अपघातातून बालंबाल बचावला आहे.
रस्त्यावर मोकाट फिरणारी गुरे-ढोरे यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून त्यावर उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
संबंधित बातम्या :
Accident| आयशर ट्रकचा भीषण अपघात, तिघे जागीच ठार, औरंगाबादच्या शिवराई फाट्यावरची घटना
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात कंटेनर उलटला, नवी मुंबईतल्या पाम बीचवर मोठा अपघात
Shocking Video : काळ आला होता, पण… पाहा, ट्रकच्या चाकाखाली जाता जाता कसा वाचला युवक