यवतमाळ : यवततमाळ (Yavatmal crime News) जिल्ह्यातील पुसद इथं एक संतापजनक घटना घडली. एका दलित कुटुंबाला गावातील सरपंचानेच मारहाण केली. याप्रकरणी तक्रार दाखल करुन गुन्हाही (Police case filed) नोंदवण्यात आला आहे. एकूण नऊ जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हळदीच्या कार्यक्रमात लावण्यात आलेल्या डीजेवरील गाण्यावरुन वाद झाला. महापुरुषांचं गाणं डीजेवर का लावलं, यावरुन सरपंचाने सवाल उपस्थित केले. त्यानंतर ते गाणं बंद करण्यावरुन वाद घातला. नंतर आपल्या काही साथीदारांना घेऊन येत सरपंचाने कुटुबीयांना मारहाण केली. यावेळी प्रचंड बाचाबाची झाली. यावेळी झालेल्या मारहाणीत काहींच्या पाठीवर जबर जखमा झाल्या. तर जातीवाचक शिवागाळ केल्याचाही आरोप करण्यात आलाय. अखेर याप्रकरणी पोलिसांनी (Yavatmal Police) गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील कारवाई केली जातेय. सध्या पुसद पोलिस याप्रकरणी सगळ्यांचीच चौकशी करत आहेत. ऍट्रोसिचीसह अन्य गुन्हे पोलिसांनी दाखल केलेत.
पुसद तालुक्यात कारला गावात ही घटना घडली. कारला येथील अनुसायाबाई प्रकाश टाळीकुटे यांच्या मुलीच्या लग्न 25 जुलै रोजी होणार होतं. त्या निमित्ताने 24 जुलैला हळदीचा कार्यक्रम सुरु होता. या हळदीच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं. हळदीच्या कार्यक्रमात डीजे वर महापुरुषाचं गाणं सुरू होते. हे गाणे का लावलं, असा प्रश्न करत गावाचे सरपंच रमेश राठोड त्या ठिकाणी आले. सरपंच राठोड यांनी गाणं बंद करण्यास सांगितले.
सरपंचांनी गाण्यावर आक्षेप घेतल्यानंतर सरपंच आणि टाळीकुटे कुटुंब यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर सरपंचांनी आपल्या काही साथीदारांना घटनास्थळी बोलवालं. इतकंच काय तर टाळीकुटे कुटुंबातील महिला आणि पुरुष सदस्यांना बेदम मारहाण केली. त्यामुळे काही जणांना पाठीवर जखमाही झाल्या. तर महिलेला सुद्धा जबर मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली, असा आरोप करण्यात आलाय.
दरम्यान, जातीवाचक शिवगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी आशाबाई टाळीकुटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून सरपंच रमेश राठोड यांच्यासह 9 संशयित आरोपी विरुद्ध अट्रोसिटी सह इतर गुन्हे दाखल करण्यात आले. सध्या पुसद पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींवर कठोरातली कठओरा कारवाई करावी अशी मागणी आशा बाई टाळीकोर आणि राजू टाळीकोर यांनी केली आहे. तर दोषींना लवकरच अटक करु असं जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी म्हटलंय.