नागपूर : बस किंवा रेल्वेने प्रवास करताना अनोळखी व्यक्तींशी जास्त जवळीक साधू नये किंवा बोलू नये, असं म्हटलं जातं. पण काहीजण प्रवास करताना झालेली ओळखी नंतर टिकवून ठेवतात. त्यामुळे काहींना त्याचा भुर्दंड पुढील आयुष्यात भरावा लागतो. असाच काहीसा प्रकार गोंदियामध्ये राहणाऱ्या एका युवतीसोबत घडला आहे.
बसमध्ये प्रवास करताना ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रेमात लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र लग्न करायची वेळ येताच प्रियकराने नकार दिला. त्यामुळे प्रेयसीने प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटना नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
पीडित मुलगी ही पुण्याला शिकायला आहे. तिची ओळख आरोपीसोबत नागपूरच्या गणेशपेठ बसस्थानकावर झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये त्यानंतर शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. आरोपीने लग्नाचं आमिष देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्यानंतर आरोपी गायब झाला. पीडित मुलीने गोंदिया येथे तक्रार दाखल केली. पण संबंधित घटना नागपूरमध्ये घडलीय. त्यामुळे ते प्रकरण नागपूरमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आहे. नागपूरचे गणेशपेठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या महिन्यात पुण्यात एक विचित्र प्रकरण समोर आलं होतं. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हनी ट्रॅप करत कोंढव्यात पनवेलच्या व्यावसायिकाला लुटल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी व्यावसायिकानं पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी व्यावसायिकाला लुटणाऱ्या टोळीला सापळा रचत अटक केली. यामध्ये एका तरुणीचाही समावेश होता.
न्यू पनवेल इथं राहणाऱ्या 31 वर्षीय व्यावसायिकाची पुण्यातल्या एका महिलेसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या महिलेनं त्याला पुण्यात भेटायला बोलावलं. त्यानुसार हा तरूण 7 ऑगस्टला कोंढव्यातल्या येवलेवाडी इथं महिलेला भेटायला आला. यावेळी या महिलेनं तरूणाला जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर व्यावसायिक आपल्या कारने पनवेलकडे जात असताना त्याला रस्त्यात 3 जणांनी अडवून व्यावसायिकाला मारहाण केली. ”तू या महिलेवर बलात्कार केला आहे. आम्ही तुझ्याविरोधात पोलिसांत तक्रार देणार आहोत” असं म्हणत तरुणाला धमकावलं. व्यावसायिकाकडे आरोपींनी 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली.
पैसै दिले नाही तर पोलिसांत तुझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करु, अशी धमकी दिली. पैसे दिले नाही तर महिलेसोबत लग्न करावं लागेल, असं कागदावर लिहून घेतलं. त्यावर तरुणाचा सही आणि अंगठा घेतला. घाबरलेल्या तरुणाने आरोपींना त्याच्याजवळ असलेले रोख 50 हजार रुपये दिले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर एटीएम कार्डमधून जबरदस्तीने 30 हजार रुपये काढून घेतले.
हेही वाचा :
मुलाच्या सासरच्यांसोबत टोकाचा वाद, माजी सैनिकाने थेट गोळ्या झाडल्या, दोघांचा मृत्यू
गायींना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं, मग गाडीत भरलं, लोणावळ्यात पशुधन चोरीचा अनोखा प्रकार