नागपूर : जादूटोणा शिकवून तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो. तुला 50 कोटी रुपये मिळू शकतात, अशी बतावणी एका तांत्रिकासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Nagpur five People arrested in blackmagic case)
एका अल्पवयीन मुलीशी काही लोक वारंवार संपर्क करत आहे, अशी तक्रार नागपूर पोलिसांकडे आली होती. काही लोक माझ्याशी वारंवार संपर्क करत आहेत. जादूटोणा शिकवून तुझ्यावर नोटांचा पाऊस पाडू शकतो असे आमिष देत आहे. त्यावरुन गुन्हे शाखा पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली.
स्वत:च्या अंगात देवी महाकाली येतो असे तो मांत्रिक सांगतो. तक्रारदार मुलगी तिच्या मैत्रिणीच्या माध्यमातून आरोपी विक्कीच्या संपर्कात आली. त्याने तुला जादूटोण्याच्या तीन स्टेप शिकाव्या लागतील. त्यानंतर तुझ्यावर नोटांचा पाऊस पडेल. तुला 50 कोटी रुपये मिळू शकतात, अशी बतावणी केली. त्यासाठी तुला जादूटोणा शिकविणारा डीआर याच्या संपर्कात यावे लागेल. आधी तुला त्याचे काम करावे लागेल नंतर तुझे काम होईल, असेही आरोपी मांत्रिकाने सांगितले.
तंत्रमंत्र साधनेसाठी कुवाऱ्या मुली हव्या असतात. वजन 50 किलो, उंची पाच फूट हवे. त्यासाठी तुला तुझे नाव आणि पाच फोटो द्यावे लागतील. तसेच तुला दर महिन्याला मासिक पाळी कधी येते. ते लिहून व्हॉटस्ॲपवर पाठवावे लागेल, असे आरोपी म्हणाला. यानंतर आरोपी मांत्रिक फार आक्रमक झाला.
तुला 50 कोटी रुपये मिळतील, असे सांगून वारंवार फोन करुन लज्जास्पद गोष्टी करु लागला. त्याने दडपण वाढवल्याने मुलीला संशय आला होता. याची तक्रार पोलिसांकडे होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतलं.
नागपूर गुन्हे शाखेकडून डीआर उर्फ सोपान हरिभाऊ कुमरे या मांत्रिकाला अटक केली आहे. त्यासोबत त्याचे सहकारी विक्की खापरे, विनोद मसराम, दिनेश निखारे आणि रामकृष्ण म्हसकर यांना अटक केली. डीआर ऊर्फ सोपान कुमरे या टोळीचा सूत्रधार आहे.
आरोपी डीआर आणि त्याच्या साथीदारांनी अशाप्रकारे अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केले असावे, असा संशय आहे. पोलीस या टोळीकडून त्यांच्या पापांचा हिशेब घेत आहेत. या टोळीच्या आमिषाला बळी पडलेल्या महिला-मुलींनी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Nagpur five People arrested in blackmagic case)
संबंधित बातम्या :
अमरावतीत बर्ड फ्लू, संक्रमित फार्मवरील 29 हजार कोंबड्या नष्ट
समलैंगिक संबंधातून क्षुल्लक वाद, पुण्यात मित्राने मित्राला संपवलं
मुंबई पोलिसांची कमाल, 77 वर्षीय महिलेच्या हत्याप्रकरणी चार दिवसांमध्ये आरोपींना बेड्या