Nagpur Hit & Run Case : तुटलेल्या नंबर प्लेट वरून शोधले हिट अँड रनचे आरोपी

| Updated on: Jun 18, 2024 | 11:08 AM

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. त्या हिट अँड रन प्रकरणावरून सुरू असलेला वादंग अद्याप शमलेला नसतानाच रविवारी नागपूरमध्येही असाच भयानक प्रकार घडला. भरधाव वेगाने आलेल्या कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले.

Nagpur Hit & Run Case : तुटलेल्या नंबर प्लेट वरून शोधले हिट अँड रनचे आरोपी
Follow us on

पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्श कारने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. त्या हिट अँड रन प्रकरणावरून सुरू असलेला वादंग अद्याप शमलेला नसतानाच रविवारी नागपूरमध्येही असाच भयानक प्रकार घडला. भरधाव वेगाने आलेल्या कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले. त्यामध्ये दोन मजुरांचा आणि काही लहान बालकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती.

आता याप्रकरणी आणखी अपडेट समोर आली असून या अपघातास जबाबदार ठरलेल्या एकूण 6 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अपघातावेळी आरोपी कारचालक मद्यधुंद अवस्थेत होत, अशी माहितीदेखील समोर आली .

तुटलेल्या नंबरप्लेटवरून आरोपींना अटक

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळ रविवारी मध्यरात्री 12.30 च्या सुमारास हा अपघात घडला. रस्त्याच्या कडेला फुटपाथवर झोपलेल्या बंजारा परिवारातील लोकांना या कारने चिरडले. फुटपाथवर झोपलेल्यांपैकी चार महिला, पुरुष आणि लहान मुले असे एकूण 9 जण जखमी झाले. त्यापैकी दोन मुजर आणि काही लहाना मुलांचा मृत्यू झाला. हा अपघात घडला तेव्हा कारमध्ये एकूण 6 जण होते, आणि त्यांनी दारू प्यायली होती असा पोलिसांना संशय होता.

याप्रकरणी नागपूरमधील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला आणि अपघातानंतर अवघ्या काही तासांतच 6 आरोपींना बेड्आ ठोकल्या. अपघातानंतर ही गाडी ताब्यात्य घेण्यात आली मात्र त्याची नंबर प्लेट तुटली होती. त्या तुटलेल्या नंबरवर प्लेटवर वाहन आणि सिरीजसह दोनच आकडे दिसत होते. तरीही पोलिसांनी नंबर प्लेटवरील 1 ते 10 आकड्यांची जोड करून गाडी मालकाचा शोध घेतला. आणि त्यानंतर शोधमोहिम राबवत विविध ठिकाणाहून 6 आरोपीना अटक केली.  हे सर्व कॉलेज स्टुडंट होते. याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

प्रत्यक्षदर्शी व्यक्तीच्या सांगण्यानुसार, अपघातावेळी ही कार खूप वेगात होती. कार वेगाने आल्यानंतर घराच्या दिशेने शिरली. या कारमध्ये काही लोक होते. फूटपाथवर बरेच लोक झोपले होते. तर अपघातात काही जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. या अपघातामधील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते.