नागपुरात होळीला 5 हजार जणांवर कारवाई, 85 वाहने जप्त, आता…

| Updated on: Mar 09, 2023 | 2:26 PM

होळी सुरु होण्याच्या आगोदर नागपूरकरांना पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करण्याचं आवाहन केलं होतं. तरी सुध्दा काल नागपूरकरांनी नियमाचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं.

नागपुरात होळीला 5 हजार जणांवर कारवाई, 85 वाहने जप्त, आता...
police
Image Credit source: tv9marathi
Follow us on

गजानन उमाटे, नागपूर : होळी (holi 2023) आणि धुलिवंदनाच्या काळात नागपूर पोलीसांनी (Nagpur Police) तब्बल पाच हजार जणांवर कारवाई केली आहे. दोन दिवसांत नागपूर पोलीसांच्या वाहतूक शाखेनं मोठी कारवाई केली आहे. होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वनभूमीवर पोलिसांनी नागपुरात ठिकठिकाणी विशेष बंदोबस्त लावला होता. पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पाच हजार नागरिकांवरती कारवाई (police action) केली आहे. त्याचबरोबर 85 वाहने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी जाहीर केली आहे. ज्यांची वाहनं जप्त करण्यात आली आहेत, त्यांची येत्या काळात अधिक चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी जाहीर केलं आहे.

नियमांचे उल्लंघण करणाऱ्या 4 हजार 763 जणांवर दंडात्मक कारवाई

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानं शहरातील मुख्य चौकात पोलीस नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी चोवीस तास रस्त्यावर पोलीस दिसून आले. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. होळीत वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 129 जणांवर कारवाई करून 85 वाहने जप्त केली आहेत. दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ बसणाऱ्या 307 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विरुद्ध दिशेने जाणारे, सीटबेल्ट, हेल्मेट न वापरणारे, चुकीच्या जागी पार्किंग करणारे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघण करणाऱ्या 4 हजार 763 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

चांगला बंदोबस्त असल्यामुळे गुन्हेगारीची एकही घटना घडली नाही

होळी सुरु होण्याच्या आगोदर नागपूरकरांना पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करण्याचं आवाहन केलं होतं. तरी सुध्दा काल नागपूरकरांनी नियमाचं उल्लंघन केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे पोलिसांचा चांगला बंदोबस्त असल्यामुळे गुन्हेगारीची एकही घटना घडली नाही.

हे सुद्धा वाचा