Nagpur | कोराडी येथील तरुणीच्या हत्येमागील आरोपीच्या 3 दिवसांमध्ये पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

| Updated on: Aug 21, 2022 | 2:55 PM

19 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कोराडी परिसरातील सुरादेवी भागात एका तरुणीचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तरूणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले आणि मृत तरुणीची ओळख पटवली. ह

Nagpur | कोराडी येथील तरुणीच्या हत्येमागील आरोपीच्या 3 दिवसांमध्ये पोलिसांनी आवळल्या मुसक्या...
Follow us on

नागपूर : नागपूरच्या (Nagpur) कोराडी येथे तरुणीची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. आता पोलिसांना हत्येमागचे गुड उघडण्यात यश मिळालंय. तरूणीच्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचं समोर येत असून या तरुणाला पोलिसांनी अटकही केलीयं. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट इथून पोलिसांनी (Police) तरूणाला अटक केलीयं. पोलिस पुढील तपास करत हत्तेचे कारण शोधत असल्याची देखील माहिती मिळतंय. विशेष म्हणजे पोलिसांनी खूनाचा तपास तीन दिवसांमध्ये करत आरोपीला अटक केलीयं. 19 ऑगस्ट रोजी तरूणीची हत्या (Murder) करण्यात आली होती. तरूणीच्या हत्येनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

कोराडी परिसरातील सुरादेवी भागात तरुणीचा खून

19 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठच्या सुमारास कोराडी परिसरातील सुरादेवी भागात एका तरुणीचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तरूणीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले आणि मृत तरुणीची ओळख पटवली. हत्या करण्यात आलेल्या तरूणीचे नाव काजल प्रजापती असल्याचे पोलिसांना कळाले. काजलला नेमकं कोणी मारलं आणि का तिची हत्या करण्यात आली हा मोठा प्रश्न पोलिसांसमोर होता.

हे सुद्धा वाचा

हिंगणघाटमधून आरोपीला पोलिसांनी केली अटक

पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत तिला दुपारच्या वेळी भेटलेला तिचा परिचित युवक जो तिचा प्रियकर असल्याचे सांगण्यात आले. तो दुपारपासून गायब असल्याचे पोलिसांना कळाले. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अवघ्या काही तासातच पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी हा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात आहे. पोलिसांनी हिंगणघाट पोलिसांची मदत घेत हिंगणघाटमधून आरोपी अंकित रंधेय याच्या मुसक्या आवळल्या आणि त्याला नागपूरला आणले. हा तरूणीचा प्रियकर असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून या तरूणाने आपल्या प्रियसीची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे पोलिस शोधत आहेत.