पालघर मॉब लिंचिंगची पुनरावृत्ती होता-होता टळली, नालासोपाऱ्यात चोर समजून तीन महिलांना चोप

| Updated on: Feb 15, 2021 | 9:31 AM

नालासोपारामध्ये चोर समजून तीन महिलांना एका सोसायटीतील रहिवाशांनी चोप दिला आहे.

पालघर मॉब लिंचिंगची पुनरावृत्ती होता-होता टळली, नालासोपाऱ्यात चोर समजून तीन महिलांना चोप
Nalasopara Ladies beaten up
Follow us on

नालासोपारा : पालघर मध्ये झालेल्या मॉब लिंचिंगची पुनरावृत्ती नालासोपाऱ्यात होता-होता (Nalasopara Crowd Beaten Up Three Woman) टळली आहे. नालासोपारामध्ये चोर समजून तीन महिलांना एका सोसायटीतील रहिवाशांनी चोप दिला आहे. सध्या या महिलांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे (Nalasopara Crowd Beaten Up Three Woman).

पालघरमध्ये झालेल्या मॉब लिंचिंगची पुनरावृत्ती होता-होता टळली

नालासोपारा पश्चिमेच्या श्री प्रस्त परिसरातील ब्लुबेरी बिल्डिंगमध्ये 12 तारखेला दुपारच्या सुमारास तीन महिला देणगी मागण्यासाठी गेल्या होत्या. स्थानिक रहिवाशांनी मुले चोरणारी टोळी समजून महिलांना गेटमध्ये डांबून मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नालासोपारा पोलिसांना घटना कळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिन्ही महिलांना ताब्यात घेतले होतं. याबाबत नालासोपारा पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. महिला देणगीसाठी आल्याचं सांगून महिलांना समज देऊन सोडल्याची माहिती नालासोपारा पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी दिली आहे (Nalasopara Crowd Beaten Up Three Woman).

महिलांना मारहाण केलेल्या सोसायटीतील लोकांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. या मारहाणीत जर महिलांसोबत कोणता अनुचित प्रकार घडला असता, तर याला जवाबदार कोण असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

Nalasopara Crowd Beaten Up Three Woman

संबंधित बातम्या :

केजरीवालांच्या कन्येची 34 हजारांना फसवणूक, तिघांना अटक, मास्टरमाईंड परागंदा

नालासोपाऱ्यात पुर्ववैमन्यासातून दोघांवर गोळीबार, एक जण गंभीर जखमी