नांदेड : नांदेडमध्ये हत्येचा (Nanded Murder News) बदला हत्येतूनच घेतला गेल्याची घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील किनवट (Kinwat Crime News) तालुक्यात घडलेल्या दोन हत्येच्या घटनांनी एकच खळबळ माजलीय. दाढी करण्यासाठी गेलेल्या एकाची भांडणातून हत्या करण्यात आली. सलून चालकासोबत तरुणाचा वाद झाला आणि दाढी करायच्या वस्त्र्यानेच गळा चिरुन 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. यानंतर अज्ञात जमावाने तरुणाची हत्या (Murder) केल्याच्या रागात सलून विक्रेत्याचाही खून केला. काळजाचा थरपाक उडवणाऱ्या या दोन्ही हत्याकांडाचा थरार 15 सप्टेंबर रोजी संध्याकाळी घडला.
किनवट तालुक्यात बोधडी इथं व्यंकटी सुरेश देवकर हा 22 वर्षांचा तरुण गुरुवारी संध्याकाळी सलूनमध्ये दाढी करायला गेला. अज्ञात कारणावरुन सलून चालक अनिल शिंदे (32) सोबत त्याचं भांडण झालं. शाब्दिक बाचाबाची वाढत केली. अखेर संतापलेल्या अनिल याने व्यंकटी याच्या गळ्यावरुन दाढी करण्यासाठी वापरला जाणारा वस्त्रा फिरवला आणि त्याची हत्या केली.
व्यंकटीच्या गळ्यावरुन वस्त्रा फिरवल्यानंतर घाबरलेला मारेकर अनिल शिंदे पळून गेला. व्यंकटीच्या गळ्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला होता. गळ्यावर दस्ती ठेवून व्यंकटी 50 फूट चालत गेला. पण अखेर तो कोसळला. दरम्यान, व्यंकटीच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या अज्ञात जमावाने अनिल शिंदे याला शोधून काढलं. अनिल हा एका नाल्याच्या काठी झुडपात लपून बसला होता.
संतप्त जमावाने अनिलला शोधून मार्केटमध्ये आणलं आणि त्यानंतर त्यालाही ठार मारलं. यानंतर बोधडी येथील मार्केटमध्ये असलेली दोन सलून दुकानंही पेटवून दिली. या घटने गावात तणाव निर्माण झाला होता. अखेर बोधडी बाजारपेठ बंद करण्यात आली. एकाच दिवशी घडलेल्या दोन हत्येच्या घटनांनी नांदेड हादरुन गेलंय.
या हत्याकांडाची माहिती मिळताच नांदेडच्या किनवट तालुक्यातील उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे, पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके, पोलीस उपनिरीक्षक एम व्ही सावंत व इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले तर आजूबाजूच्या ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनाही पाचारण करण्यात आलय. सध्या पोलिस या हत्याकांड प्रकरणी पुढील तपास करत आहेत.