नांदेडः धुळवडीच्या दिवशी (Nanded Dhulwad) नांदेडमधील माळटेकडी उड्डाणपुलावर झालेल्या गोळीबार (Firing) प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून पाठलाग करून या आरोपींना पकडले. हे सराईत गुन्हेदार असून पोलिसांनी आरोपींना विमानतळ पोलिसांच्या (police) ताब्यात दिले आहे. धुलिवंदनाच्या दिवशी शहरात उत्साहाचे वातावरण होते. मात्र तोंडावर रंग लावून आणि रुमालाने तोंड झाकून आलेल्या दोघांनी दीपक बिगानिया या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत बिगानिया जखमी झाला होता. त्यावेळी घटनास्थळ पोलील उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
शहरात धुलिवंदनाच्या दिवशी सर्वजण उत्साहात होते. एकमेकांना रंग लावण्यात अनेक नागरिक दंग होते. याच वेळी माळटेकडी उड्डाणपुलावर ही घटना घडली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आरोपी तोंडाला रंग लावून आले होते तसेच तोंडाला रुमालही बांधला होता. त्यांनी काही काळ दीपक बिगानिया या तरुणाचा पाठलाग केला. पूर्ववैमनस्यातून त्यांनी बिगानिया याच्यावर गोळीबार केला होता. यात बिगानिया जखमी झाला होता. पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पथके नियुक्त केली होती.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पोलीस या आरोपींच्या शोधात होते. बोंढार बायपासवर गाडेगाव येथे हे आरोपी फरित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांचे पथख त्या ठिकाणी पोहोचताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलिसांनी पाठलाग करून ईश्वरसिंग गाडीवाले, राधेश्याम अंकुशराव कुंडगीर, कुलविंदरसिंग महाजन आणि गणपतसिंग मठवाले या चार जणांना अटक केली.
इतर बातम्या-