नांदेड : नांदेडच्या हणेगाव येथील एका कापड व्यवसायिकाच्या मुलीचे बटाईदाराच्या मुलासोबत प्रेमसंबंध जुळले. याच प्रेमसंबंधातून त्यांनी पळून जाऊन लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. पण मुलीने पळून जाताना घरातील 72 लाखांचे दागिने, 25 लाखांची रोख रक्कम नेली, असा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच मुलाने मुलीचे धर्मांतरही केल्याता आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी मुलीचे वडील संजिवकुमार काशिनाथअप्पा अचारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे (Nanded textile businessman allegations of robbery on his daughter and his lover after their love marriage).
देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील एका कापड व्यावसायिकाची मुलगी प्रियकरासोबत घर सोडून निघून गेली. मुलीचं वय 19 वर्ष आहे. ती इयत्ता बारावी उत्तीर्ण आहे. तर मुलगा दहावी नापास आहे. मुलीचे वडील हे मोठे कापड व्यवसायिक आहेत. तर मुलाचे वडील हे मुलीच्या वडिलांची शेती कसत होते. मुलीने प्रियकरासोबत पळून जाताना घरातील 72 लाखांचे दागिने घेवून गेल्याची तिच्या नातलगांची तक्रार आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी मुलीचे कुटुंबिय न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार मरखेल पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार बटाईदार असणाऱ्या मोइनोद्दीन अत्तार यांच्या मुलाने मुलीशी जवळीक आणि मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केल्याचा आरोप आहे. यात मुलीच्या प्रियकराने परंपरागत 74 तोळ्याचे दागदागिने, सोने, नगद 25 लाख रुपयासह पोबारा केलाय, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच मुलाने मुलीचे धर्मांतर करुन इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा दावा मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे (Nanded textile businessman allegations of robbery on his daughter and his lover after their love marriage).
दरम्यान, मुलीला पळवून नेल्याची तक्रार देण्यास गेलेल्या वडिलांचा मरखेल पोलिसांनी आधी व्हिडिओ जवाब घेतला. पण त्यानंतर आठ दिवस तक्रार घेतली नाही. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी न्यायालयाचं दार ठोठावलं. त्यानंतर न्यायालयात दाद मागून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला, असा दावा करण्यात आला आहे.
रकमेसह पलायन केलेल्या प्रियकराने हैदराबाद येथे मुलीचे धर्मांतर केले, असा आरोपही मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. पण त्याचवेळी नांदेड पोलिसांनी छापा मारून संबंधितांना ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे हणेगाव येथे तणाव पूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
हेही वाचा :