मुंबईः मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि इतरांविरुद्ध खंडणीच्या गुन्ह्या प्रकरणात आरोपी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाले आणि निरीक्षक आशा कोरके यांना सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. कथित वसुली प्रकरणात सीआयडीने दोघांनाही अटक केली होती. महाराष्ट्राच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) मुंबई गुन्हे शाखेत यापूर्वी तैनात असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली होती. या दोन्ही पोलीस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. आज दोघांना किला कोर्टात हजर केले असता सरकारी पक्षाने दोघांची 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली. या दोघांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती.
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना सीआयडीने मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. आरोपींनी पैशांचा व्यवहार केल्याचे सबळ पुरावे सीआयडीच्या हाती लागले होते. सीआयडीकडून दोन्ही आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपींनी तक्रारदाराकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच मकोका अंतर्गत कारवाई न करण्यासाठी 50 लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. यातील मुख्य आरोपी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात नाँन बेलेबल वॉरंट जारी केलंय. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपींना 7 दिवसा़ंची कोठडी सुनावलीय. या दोन अधिकाऱ्यांपैकी एक पोलीस अधीक्षक नंदकुमार गोपाळे हे खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात तर पोलीस निरीक्षक आशा कोरके हे नायगाव येथे तैनात आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. रिअल इस्टेट व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी 22 जुलै रोजी त्यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. एफआयआरमध्ये परमबीर सिंग यांच्यासह सात जणांची नावे आहेत.
विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी ठाणे कोर्टापाठोपाठ मुंबईच्या किल्ला कोर्टानेही मुंबईची माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं. गुन्हे अन्वेषण विभागाच्या याचिकेवर सुनावणी करताना अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. परमबीर सिंग यांच्यासह विनय सिंग आणि रियाज भाटींविरोधातही अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. परमबीर सिंग यांच्या विरोधात मुंबईसह ठाण्यात वसुलीप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आलेली होती. मात्र, अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे ठाणे कोर्टानंतर आता मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केलं होतं.
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यांच्यावर अॅट्रॉसिटी आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात तपासादरम्यान त्यांना वारंवार समन्स बजावूनही ते कुठे आहेत? याचा पत्ता राज्य सरकारला लागू शकलेला नाही. त्यामुळे आता परमबीर सिंह यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार नाही, असा शब्द आम्ही देणार नाही, असं राज्य सरकारनं 20 ऑक्टोबर रोजी हायकोर्टात म्हटलं होतं. अॅट्रॉसिटी प्रकरणात दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं, त्याला सिंह यांनी उत्तर दिलं होतं, अशी माहिती सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात दिली होती.
संबंधित बातम्या:
समीर वानखेडेंनी धर्मांतर केल्याचं दिसत नाही, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांचं मोठं विधान