नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) शिवशाही बस (Shivshahi bus) खांबावर आदळल्याने झालेल्या अपघातात (Accident) एक जण ठार, तर 6 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. तपोवन कॉर्नर भागामध्ये हा अपघात झाला. ही बस नाशिकहून औरंगाबादकडे जात होती. मात्र, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस थेट उड्डाणपुलाखालील 44 नंबरच्या खांबावर जावून आदळली. दरम्यान, दुसरीकडे अजूनही पुरेसी बससेवा सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. जे काही मोजके कर्मचारी कामावर आहेत त्यांच्यावर ताण वाढला आहे. एसटी महामंडळाने नवीन कर्मचारी भरतीही पुरेशी केली नाही. त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. कदाचित शिवशाहीचा झालेला अपघात हा कामाच्या अती ताणातून झाला नसेल ना, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
कशी घडली घटना?
नाशिकहून शिवशाही बस औरंगाबादकडे निघाली होती. ही बस तपोवन कॉर्नर येथे आली असता चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे शिवशाही थेट उड्डाणपुलाखाली असलेल्या खांबावर जावून आदळली. यावेळी समोर असलेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. त्याचे अजून नाव समजू शकले नव्हते. उड्डाणपुलाच्या 44 नंबरच्या खांबाला ही बस आदळली. या अपघातामध्ये इतर सहा जण जखमी झाल्याचे समजते. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, अजूनही एसटीचा संप मिटल्याची घोषणा सरकारने केली असली तरी अजूनही बससेवा सुरळीत सुरू नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
कार दुकानात घुसली
नाशिकमध्ये झालेल्या दुसऱ्या एका अपघातामध्ये निफाड येथे एक भरधाव कार दुकानात घुसल्याची घटना उघडकीस आली आहे. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. चालक मद्यधुंद अवस्थेत होता. मात्र, सुदैवाने या अपघातामध्ये कुठलिही जीवितहानी झाली नाही. या घटनेचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्हीमध्य कैद झाला आहे. या घटनेत दुकानाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची पोलीस ठाण्यात अजून तरी नोंद झालेली नव्हती.
बस कधी सुरू होणार?
एकीकडे सरकारने एसटीचा संप मिटल्याची घोषणा केली. मात्र, दुसरीकडे अजूनही बहुसंख्य कर्मचारी कामावर परतले नाहीत. त्यामुळे राज्यभरातील एसटीसेवा विस्कळीत झाली आहे. दीर्घ पल्ल्यासोबत कमी पल्ल्याच्या बहुतांश गाड्या धावताना दिसत नाहीत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. जे कर्मचारी कामावर आहेत, त्यांच्यावरही ताण वाढला आहे. नाशिकमध्ये झालेल्या शिवशाही बसचा अपघात याच ताणातून झाला आहे का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. सरकारने लवकरात लवकर एसटीसेवा पूर्ववत करून सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
Nashik | प्रारूप प्रभाग रचनेत धक्क्यावर धक्के, अनेक नगरसेवक गॅसवर; महापौरांनाही जोर का झटका धीरे से…
टेन्शन खल्लास, नाशिक जिल्ह्यात अंगणवाडी केंद्रातच काढून मिळेल मुलांचे आधार कार्ड; काय आहे योजना?
Nashik | ‘महाडीबीटी’ पोर्टल संथ, विद्यार्थी हैराण; शिष्यवृत्तीसाठी कधीपर्यंत करता येणार अर्ज?