नाशकात भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून

| Updated on: Nov 26, 2021 | 10:45 AM

नाशिक शासकीय रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात अधिकची कुमक बोलावून घेतली आहे. भाजप सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे.

नाशकात भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या, चार दिवसात जिल्ह्यात तिसरा खून
Amol Ighe
Follow us on

नाशिक : नाशिकमधील सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाशिक शहर हत्येच्या घटनेनं हादरलं असून अवघ्या चार दिवसात नाशिकमधील ही तिसरी हत्येची घटना आहे.

नेमकं काय घडलं?

नाशिकमधील सातपूरचे भाजप मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या करण्यात आली. पहाटे सहा वाजता अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना फोन केला. त्यांना घराबाहेर बोलावून वार करत इघेंची निर्घृण हत्या केली. नाशिकमधील
कार्बन नाका परिसरात ही घटना घडली.

युनियनच्या वादातून अमोल इघे यांची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून पहाटे सहा वाजता नेमकं काय घडलं, याचा शोध पोलीस घेत आहेत.

रुग्णालय परिसरात समर्थकांची गर्दी

दरम्यान, नाशिक शासकीय रुग्णालयात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात अधिकची कुमक बोलावून घेतली आहे. भाजप सातपूर मंडल अध्यक्ष अमोल इघे यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली आहे. नातेवाईक आणि कार्यकर्त्यांची जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रचंड गर्दी झाली आहे.

अवघ्या चार दिवसात नाशिकमधील हत्येची ही तिसरी घटना आहे. नाशिक महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीवर आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

पाहा व्हिडीओ :

तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीची हत्या

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी जामिनावरुन तुरुंगाबाहेर आलेल्या आरोपीचा अज्ञात व्यक्तींनी निर्घृण खून केल्याची घटना नाशिकमधील पंचवटी परिसरात घडली होती. प्रवीण काकड असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रवीण हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

संबंधित बातम्या :

नाशिकमध्ये जामिनावर सुटलेल्या आरोपीची निर्घृण हत्या