नाशिकः शिवजयंतीच्या तोंडावर नाशिक (Nashik) जिल्ह्यात उत्साह शिगेला पोहचलाय. कोरोना ओसरल्याने यंदा दणक्यात शिवजयंती साजरी करायचा निर्धार तरुणांनी केलाय. तत्पूर्वीच चक्क शिवस्मारकासाठी लाच (bribe) मागितल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) देवळा तालुक्यातल्या चिंचवे येथील सरपंचाला बेड्या ठोकल्यात. तर एका प्रकरणात शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी लाच मागितल्याचे उघड झाले, तर एका ठिकाणी चक्क मजूर महिलेचे रेशन सुरू करण्यासाठीही लाच मागितली. त्यामुळे सामान्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झालाय. कुठल्याही सरकारी कार्यालयाची पायरी चढा, पैसे ठेवल्याशिवाय काम होत नाही. याला काही अपवाद आहेत. मात्र, त्यांची संख्या दुर्मिळ आहे. त्यामुळे नागरिकांची कामे अशक्य होऊन बसलीयत.
प्रकरण पहिले
देवळा तालुक्यातील चिंचवे गावातली ही घटना. येथे सरपंचपदी आहेत रवींद्र पवार. त्याने चक्क शिवस्मारकाच्या कामासाठी पैसे मागितल्याचे समोर आले. शिवस्मारक उद्यान चौक सुशोभीकरणाचे काम करण्यात आले आहे. हे काम झाल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीला द्यायचे होते. मात्र, सरपंच रवींद्र पवाराने एका मध्यस्थामार्फ संबंधितास लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच द्यायची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यांनी सापळा रचला. या सापळ्यात लाच स्वीकारण्यासाठी आलेली व्यक्ती सापडली असून, त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
प्रकरण दुसरे
लाचखोरीचे दुसरे प्रकरण भूमिअभिलेख कार्यालयात उघडकीस आले आहे. तक्रारदारास जमिनीची मोजणी करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी भूमिअभिलेख कार्यालय गाठले. मात्र, तिथे योगेश चौधरी, योगेश कातकाडे यांनी पैशाची मागणी केली. तक्रारदाराला पैसे द्यायचे नव्हते. त्यामुळे त्यांनी लाललुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचला. त्यात 80 हजारांची मागणी करून तडजोडीअंती 50 हजार रुपये स्वीकारायला तयार झाल्याचे समोर आले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण तिसरे
लाचखोरीची तिसरी घटना महसूल विभागत घडलीय. पेठ तहसील कार्यालयात एका अव्वल कारकुनाने चक्क आदिवसी महिलेला तिचे रेशन पूर्ववत सुरू करण्यासाठी 5 हजारांची लाच मागितली. ही महिला अंबास, उबरपाडा येथील रहिवासी आली. महिलेने मजुराच्या रेशनकार्डमधून पतीचे नाव कमी करत रेशन सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र, तिला पैसे मागितले. लाचेची पाच हजारांची रक्कम तहसील आवारात स्वीकारण्यात आली. नेमका याचवेळी पथकाने छापा टाकला. पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, मीरा आदमाने यांच्या पथकाने कारवाई करून लाच स्वीकारताना कारकून सुनील पुंडलिक बोरसे याला बेड्या ठोकल्या.
Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!