CCTV Video : नाशिकमध्ये चुकून रेस गाडी झाली अन् मुलगी थेट एटीएममध्ये घुसली

| Updated on: Jun 04, 2022 | 5:18 PM

सावता नगर, सिडकोमध्ये राहणारी गौरी सैदाने ही तरुणी सकाळी 9.30 च्या सुमारास ही तरुणी घरातून ताक आणि एटीएममधून पैसे आणण्यासाठी स्वतःच्या मोपेड गाडीवरुन गेली होती. मात्र याच दरम्यान मुलीचा आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटले. यानंतर ही दुचाकी थेट एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये घुसली. या अपघातात गौरीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

CCTV Video : नाशिकमध्ये चुकून रेस गाडी झाली अन् मुलगी थेट एटीएममध्ये घुसली
नाशिकमध्ये चुकून रेस गाडी झाली अन्...
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिक : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणीकडून गाडीवरील ताबा (Control) सुटला आणि दुचाकी (Two Wheeler) थेट एटीएममध्येच घुसल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या सावतानगर परिसरातील महालक्ष्मी चौक मंदिरासमोर असलेले एसबीआय बॅकेच्या एटीएमजवळ ही घटना घडली आहे. या घटनेत तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत (Injured) झाली आहे. ही सर्व घटना तेथील एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जखमी तरुणीला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गौरी प्रदीप सैदीने असे (18) जखमी तरुणीचे नाव आहे. या घटनेत एटीएमचे किरकोळ नुकसान झाले आहे.

ताक घेण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी चालली होती तरुणी

सावता नगर, सिडकोमध्ये राहणारी गौरी सैदाने ही तरुणी सकाळी 9.30 च्या सुमारास ही तरुणी घरातून ताक आणि एटीएममधून पैसे आणण्यासाठी स्वतःच्या मोपेड गाडीवरुन गेली होती. मात्र याच दरम्यान मुलीचा आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटले. यानंतर ही दुचाकी थेट एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये घुसली. या अपघातात गौरीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही सर्व घटना बाजूच्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एटीएममध्ये झालेल्या दुर्घटनेची माहिती एसबीआय बँकेलाही कळवली. यानंतर एसबीआय बँकेचे कर्मचारीही तेथे दाखल झाले. ही घटना घडली तेव्हा तेथूनच एक वयोवृद्ध व्यक्ती चालले होते. सुदैवाने ही व्यक्ती या अपघातातून बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (A two-wheeler rammed into a SBI Bank ATM after losing control of the vehicle in Nashik)

हे सुद्धा वाचा