Nashik Youth Drowned : नाशिकमध्ये भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तरुण वाहून गेला, आपत्ती व्यवस्थापन टीमकडून शोध सुरु

| Updated on: Jul 25, 2022 | 1:03 AM

इगतपुरी तालुक्यातील जामुंडे गावच्या परिसरात भावली धरणाचे बॅकवॉटर आहे. येथे सुनील सांगळे, सुहास जगताप, ऋषिकेश गावले, दिनेश पंडित हे चौघे मित्र रविवारी दुपारी अंघोळीसाठी आले होते.

Nashik Youth Drowned : नाशिकमध्ये भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तरुण वाहून गेला, आपत्ती व्यवस्थापन टीमकडून शोध सुरु
नाशिकमध्ये भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरात तरुण वाहून गेला
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिक : भावली धरणा (Bhavali Dam)च्या बॅकवॉटर परिसरात अंघोळीसाठी गेलेला तरुण (Youth) वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारी इगतपुरी तालुक्यात घडली आहे. सुनील सोनू सांगळे असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीम आणि इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीचे पथक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तरुणाचा शोध (Search) घेतला. मात्र अद्याप तो सापडला नाही. आपत्ती व्यवस्थापन टीमकडून शोध सुरु आहे.

अंघोळीसाठी धरणात गेला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला

इगतपुरी तालुक्यातील जामुंडे गावच्या परिसरात भावली धरणाचे बॅकवॉटर आहे. येथे सुनील सांगळे, सुहास जगताप, ऋषिकेश गावले, दिनेश पंडित हे चौघे मित्र रविवारी दुपारी अंघोळीसाठी आले होते. मयत सुनील सांगळे हा इगतपुरीजवळ असणाऱ्या एका बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून काम करतो. चौघे जण अंघोळीसाठी धरणात उतरले होते. यावेळी सुनीलला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ही घटना घडल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन टीम कसारा व इगतपुरीच्या महिंद्रा कंपनीच्या आपत्ती व्यवस्थापन टीम सुनील सांगळे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस आणि प्रशासनाने ह्याबाबत नोंद घेतली असून शोधकार्य सुरु करण्यात आलेले आहे. (A youth was swept away in the backwater area of Bhavli Dam in Nashik)

हे सुद्धा वाचा