नाशिक : प्रेमप्रकरण व लग्न मोडल्याप्रकरणी प्रेयसी (Girlfriend)नेच कुटुंबाच्या मदतीने प्रियकरा (Boyfriend)ला जाळण्याचा प्रकार शुक्रवारी नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर गावात घडला होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या प्रेयसी व तिच्या कुटुंबियांना शनिवारी न्यायालयासमोर उभे असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. या घटनेत प्रियकर गोरख बच्छाव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेत तरुण 80 टक्के भाजल्याची माहिती मिळते. देवळा पोलिसांनी याप्रकरणी प्रेयसी कल्याणी सोनवणेसह तिची आई, वडील व दोन भाऊ अशा पाच जणांना अटक केली आहे. (All five accused in Nashik youth attack case remanded in police custody for 3 days)
आरोपी मुलीचे आणि पीडित तरुणाचे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोन महिन्यांपूर्वीच त्यांचे काही कारणाने ब्रेकअप झाले. यानंतर मुलीचे दुसरीकडे लग्न ठरले होते. परंतु मुलाकडच्यांनी नंतर लग्न मोडले. यामुळे पीडित तरुणानेच ब्रेकअपच्या रागातून लग्न मोडले असा संशय मुलगी आणि तिच्या घरच्यांना आला. याच संशयातून मुलगी, तिचे आई-वडिल आणि दोन भाऊ यांनी मुलाच्या गावात जाऊन त्याला जाब विचारत जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती देवळा पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या मुलाला नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. तसेच मुलीसह तिच्या कुटुंबातील पाच जणांना अटक केली. यानंतर या पाचही जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.
कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलाने मिळून बँक अधिकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात उघडकीस आली आहे. आधी घरात त्यांची केली आणि आत्महत्या भासवण्यासाठी सातव्या मजल्यावरुन मृतदेह खाली फेकला. मात्र ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी मायलेकाला अटक केली आहे. हत्या प्रकरणी आंबोली पोलिसांनी मायलेका विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. (All five accused in Nashik youth attack case remanded in police custody for 3 days)
इतर बातम्या