येवला मनमाड मार्गावर भीषण अपघात झाला. तीन वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या गंभीक जखमी झालेल्या रुग्णावर उपचार सुरु आहेत.
एक ट्रक, टँकर आणि पिकअप वाहनांचा एकमेकांमध्ये अपघात झाला. यामध्ये पिकचा चक्काचूर झाला. तर टँकरची ट्रॉली एक बाजूला आणि स्टेअरींग कॅबिन दुसऱ्या बाजूला कलंडलं होतं.
पिकअप चालक गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात पिकअप चालकाला जबर मार लागला होता. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
येवला- मनमाड रोड वरील येवला तालुक्यातील गोपाळवाडी फाटा इथं हा अपघात घडला. या फोटोंच्या माध्यमातून हा अपघात किती भीषण होता, याची कल्पना करता येऊ शकते.
तीन वाहनांच्या विचित्र अपघातानंतर येवला-मनमाड मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली होती.
पिकअप वाहनाचा या अपघातात अक्षरशः चक्काचूर झालाय.
वाहतूक पोलिसांनी या अपघाताची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे मोठा वाहतूक कोंडी झाली होती.