आधी निसर्गाने कंबरडं मोडलं, आता बँकेचा तगादा, मानसिक खच्चीकरणातून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

| Updated on: Nov 03, 2021 | 7:25 PM

मयत शेतकरी अशोक लांडे यांची 20 एकर शेती आहे. या शेतात मका, कांदा आणि कांद्याची रोपे अशी पिके घेतली जातात. पिक लागवडीसाठी अशोक लांडे यांनी एचडीएफसी बँकेकडून वडिल आनंदा लांडे यांच्या नावावर 4 लाखांचे कर्ज घेतले होते.

आधी निसर्गाने कंबरडं मोडलं, आता बँकेचा तगादा, मानसिक खच्चीकरणातून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
मानसिक खच्चीकरणातून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
Follow us on

येवला : सतत येणारी नैसर्गिक आपत्ती आणि शेतीचे नुकसान यामुळे आधीच शेतकरी बेजार झाला आहे. त्यात शेतीचे पुरेसे उत्पन्न न आल्याने आधीच पोटाचा प्रश्न ऐरणीवर असताना बँकेकडून सतत कर्जासाठी तगादा सुरु असल्याने मानसिक तणावातून एका शेतकऱ्याने गळफास घेत आत्यहत्या केल्याची घटना येवल्यात घडली आहे. अशोक आनंदा लांडे(55) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर बँकेचे 3 ते 4 लाखाचे कर्ज आहे. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, दोन मुलगे आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी तसेच वादळ यामुळे शेतकऱ्यांची पीके वाहून गेली, तर काही पीके पाण्याने कुजल्याच्या घटना घडल्या. या सर्वामुळे आडात नाही तर कोहऱ्यात कुठून येणार अशी अवस्था शेतकऱ्याची झाली आहे. त्यामुळे उपजिविकेचीच समस्या आ वासून उभी असताना बँकेचे कर्ज कसे फेडणार हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यातून बँकेकडून कर्जाची परतफेड करण्यासाठी सतत होत असलेली गळचेपी यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात मानसिक खच्चीकरण होत आहे. याचाच परिणाम म्हणून शेतकरी आत्महत्येसारखे गंभीर पाऊस उचलत आहे.

अतिवृष्टीमुळे लांडे यांच्या 20 एकर शेतीचे नुकसान

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला परतीचा पाऊस झाला होता. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मयत शेतकरी अशोक लांडे यांची 20 एकर शेती आहे. या शेतात मका, कांदा आणि कांद्याची रोपे अशी पिके घेतली जातात. पिक लागवडीसाठी अशोक लांडे यांनी एचडीएफसी बँकेकडून वडिल आनंदा लांडे यांच्या नावावर 4 लाखांचे कर्ज घेतले होते. अतिवृष्टीमुळे लांडे यांच्या शेतातील सर्व पिकांचे नुकसान झाले. काही पीके वाहून गेली तर काही आलीच नाही. यामुळे लांडे यांचे अतोनात नुकसान झाले. उत्पन्नच आले नाही त्यामुळे बँकेचे कर्ज फेडणे अशक्य झाले. मात्र बँकेकडून कर्जाचे हफ्ते वसुल करण्यासाठी सतत तगादा सुरु होता.

परतीच्या पावसाचा येवल्यातील उत्तर-पूर्व सर्वाधिक धूमाकूळ

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पावसाने मोठा धुमाकूळ घातला होता. यामुळे सर्वत्र पिकांमध्ये पाणीच पाणी साचले होते. या पावसाच्या पाण्यामुळे द्राक्षे, मका, कांदा, भुईमूग, सोयाबीन या सह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानीमुळे पिकांना कवडीमोल भाव येत असल्याने काही शेकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यापुढे उभा राहिला आहे. (Debt-ridden farmer commits suicide due to mental stress in Yeola)

इतर बातम्या

Video : इथं राम क्वारंटाईन झाला 14 दिवस सीतेनं डोकवून नाही पाहिला रे, इंदोरीकर महाराजांची टोलेबाजी

लासलगाव बाजार समितीत शेतकरी-व्यापाऱ्यात शाब्दिक बाचाबाची, व्हिडीओ व्हायरल