Nashik Fire : नाशिकमध्ये अग्नीतांडव, एअर फोर्सच्या भागात वणवा पेटला; दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण

| Updated on: May 06, 2022 | 9:46 PM

आगीने रुद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब होत आहे. जवळच विमानतळ असल्याने धोका वाढला आहे. अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Nashik Fire : नाशिकमध्ये अग्नीतांडव, एअर फोर्सच्या भागात वणवा पेटला; दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण
नाशिकमध्ये अग्नीतांडव, एअर फोर्सच्या भागात वणवा पेटला
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिक : नाशिकमधील एअर फोर्स (Air Force)च्या भागात अचानक वणवा पेटला. हजारो हेक्टरवर वणवा पेटल्याने सगळीकडे अग्नीतांडव सुरु झाले. मात्र दोन तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्नीशमन दलाला आग (Fire) विझवण्यास यश आले आहे. नाशिक तसेच आसपासच्या परिसरातील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीने रुद्र रूप धारण केल्याने आग आटोक्यात आणण्यास विलंब होत होता. जवळच विमानतळ असल्याने धोका वाढला होता. अग्नीशमन दलाच्या 10 गाड्यांनी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. (Fire erupts in Air Force area Nashik; 10 vehicles of fire brigade rushed to the spot)

दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यास यश

दोन तासापूर्वी नाशिकच्या एअरफोर्स परिसरात अचानक वणवा पेटला. बघता बघता वणवा हजारो हेक्टरवर पसरला. आगीने रौद्र रुप धारण केले होते. जवळच विमानतळ असल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. आगीचे रौद्र रुप पाहता नाशिकच्या आसपासच्या परिसरातील अग्नीशमन गाड्याही घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. अग्नीशमन दलाने दोन तास शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. तसेच विमानतळाला कोणत्याही प्रकारचा धोका झाला नाही. मात्र हजारो हेक्टरवरील गवत जळून खाक झाले. दरम्यान, ही नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. अग्नीशमन पथक पुढील तपास करत आहे. (Fire erupts in Air Force area Nashik; 10 vehicles of fire brigade rushed to the spot)

हे सुद्धा वाचा