नाशिक : नाशिकच्या मुंबई नाका पोलीस स्टेशन लगत असलेल्या बिल्डिंगमधील बंद असलेल्या गाळ्यांमध्ये मानवी अवयव (Human Organs) सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गाळेधारकाकडे विचारणा केली असता त्याने याबाबत काहीच माहित नसल्याचे सांगितले. जवळपास पंधरा वर्षापासून गाळे (Gala) बंद असल्याचा गाळा मालकाने दावा केला आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. मेडिकल शिक्षणासाठी मानवी अवयव संकलन करतात त्याचं पद्धतीने हे अवयव संकलन केलेले दिसले. (Human organs found in Nashik, police investigation started)
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मुंबई नाका येथील एका सोसायटीच्या बंद गाळ्यामध्ये मानवी अवयव सापडले आहेत. वेगवेगळ्या बॉटलमध्ये केमिकल प्रक्रिया करून मानवी डोके, हात, कान असे वेगवेगळे मानवी अवयव ठेवण्यात आले आहेत. तर बादलीमध्ये देखील केमिकल प्रक्रिया करून मानवी अवशेष ठेवले आहेत. गेल्या 15 वर्षांपासून आपण गाळे उघडले नाहीत, त्यामुळे आपल्याला काहीच माहित नसल्याचे गाळे मालकाने पोलिसांना सांगितले. गाळा मालकाच्या म्हणण्यानुसार पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी या गाळ्यामध्ये स्थायिक होते. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
इमारतीची पाण्याची टाकी साफ करताना गुदमरल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात घडली आहे. टाकी साफ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे गुदमरुन कामगारांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विवेक कुमार आणि योगेश नरवणकर अशी मृत कामगारांची नावे आहेत तर मिथुन कुमार व गणेश नरवणकर अशी गंभीर असलेल्या कामगारांची नावे आहेत. संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास नौपाडा पोलीस करीत आहेत. (Human organs found in Nashik, police investigation started)
इतर बातम्या
यवतमाळमध्ये जुना वाद उफाळून आला, आरोपींनी विष पाजून तरुणाचा काटा काढला! पाच आरोपी अटकेत