नाशिक : पत्नीला ‘हॅपी बर्थडे’ म्हणून शुभेच्छा देत पतीनेच तिच्या पोटात चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर आरोपी पतीने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. नाशिक जिल्ह्यात पत्नीच्या माहेरी जाऊन पतीने हल्ला केला. यामध्ये पती-पत्नी दोघंही गंभीर जखमी झाले आहेत.
काय आहे प्रकरण?
वाढदिवशीच पतीने पत्नीला शुभेच्छा देत पोटात चाकू खुपसून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सिन्नरमध्ये समोर आला आहे. त्यानंतर संशयित आरोपीने स्वतःच्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. संशयित आरोपी असलेल्या पतीचे नाव संतोष पवार असे आहे. गेल्या तीन वर्षांपासून या दोघा पती-पत्नींमध्ये कौटुंबिक वाद सुरु आहे.
नेमकं काय घडलं?
वाढदिवसानिमित्त नांदूर शिंगोटे येथे माहेरी आलेल्या कमल पवार यांच्या घरात घुसून पती संतोषने हा प्रकार केला. हल्ल्यात पती-पत्नी दोघेही अत्यवस्थ असून त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात कारवाई करण्याची मागणी महिलेच्या नातेवाईकांकडून होत आहे.
पाहा व्हिडीओ :
पश्चिम बंगालमध्ये पतीकडून पत्नीीची हत्या
दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील एका जोडप्यामध्ये फेसबुक चॅटिंगवरुन झालेला वाद इतका वाढला, की पतीने आपल्या पत्नीचा जीव घेतला. पतीला संशय होता की पत्नी चॅटिंगद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे. यामुळे त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला. अखेर वाद इतका विकोपाला गेला, की पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. ही खळबळजनक घटना पश्चिम बंगालमधील हुगली जिल्ह्यातील आहे.
नेमकं काय घडलं?
हुगळी जिल्ह्यातील चंदननगर पोलीस स्टेशन परिसरात पती रिंटू दासने पत्नी पल्लवी दासचा (23 वर्ष) गळा दाबून खून केला. याचं कारण म्हणजे पत्नी सतत फेसबुक चॅटिंगमध्ये बिझी असायची. आरोपी पती रिंटू दासला संशय होता, की त्याची पत्नी पल्लवी फेसबुक चॅटद्वारे इतर पुरुषांशी मैत्री करत आहे. यामुळे त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर शंका होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी श्रीरामपूर गिरवळ येथून रुग्णालयात पाठवला.
भाऊ संशयी, वहिनीला मारहाण
आरोपी रिंटू दासचा भाऊ सिंटू दास याने सांगितले की वहिनी चांगल्या स्वभावाची होती पण आपला भाऊ नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा आणि नेहमी तिला मारहाण करायचा.
पोलीस तपास सुरु
आरोपीची आई माना दास यांनी सांगितले की तिची सून पल्लवी दासला फेसबुक चॅटिंगची आवड होती, त्यामुळे पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असत. या हत्येविषयी माहिती देताना चंदननगर आयुक्तालयाचे डीसीपी मुख्यालय प्रवीण प्रकाश म्हणाले की, आरोपी पती रिंटू दासला पोलिसांनी भादंविच्या कलम 302 आणि 498 ए अंतर्गत अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कारवाई केली जात आहे.
संबंधित बातम्या :
वहिनीची चाकूने भोसकून हत्या, दीराला अटक
दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला