नाशिक : जमिनीच्या मालकीच्या वादातून जुन्या आणि नवीन मालकामध्ये राडा झाला. पोलिसांच्या समोरच दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. हाणामारीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये खोडे नगर भागामध्ये 8 ऑगस्ट रोजी ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. जमिनीच्या मालकीच्या वादातून जुन्या आणि नवीन मालकामध्ये म्हणजे दोन गटांमध्ये हाणामारी आणि दगडफेक झाली. धक्कादायक म्हणजे हाणामारी आणि दगडफेकीचा सर्व प्रकार सुरु असताना पोलीस होते, मात्र काही वेळाने चक्क पोलिसांनीच घटनास्थळावरुन पळ काढल्याचं पाहायला मिळत आहे.
सीसीटीव्ही फोडण्याचा प्रयत्न
हाणामारीच्या घटनेत 2 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे याचा पुरावा नष्ट करण्यासाठी दगड फेकून सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी काय कारवाई होणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
पाहा व्हिडीओ :
औरंगाबादेतही राम भोगलेंच्या कंपनीत गुंडांचा राडा
दरम्यान, औरंगाबाद शहरातील औद्याोगिक वसाहतींमध्ये दादागिरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध उद्योजक राम भोगले यांच्या भोगले ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दहा ते पंधरा गुंडांनी प्रवेश केला. त्यानंतर कंपनीचे सीईओ असलेल्या नित्यानंद भोगले यांना मारहाण केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.
संबंधित बातम्या :
CCTV VIDEO | औरंगाबादेत गुंडगिरी, उद्योजक राम भोगलेंच्या कंपनीत घुसून 10 ते 15 जणांची CEO ना मारहाण
VIDEO | औरंगाबादेत शेतकरी कुटुंबाला बेदम मारहाण, पुरुषांसह महिलांनाही चोप