नाशिक : ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ (No Helmet No Petrol) हे धोरण राज्यातील अनेक शहरात राबवलं जात आहे. त्यावरुन अनेक दुचाकीस्वारांचे पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांशी खटकेही उडताना दिसत आहेत. विनाहेल्मेट पेट्रोल का दिले नाही, म्हणून नाशकातही (Nashik) गोंधळ झाल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. बाईक चालकाने पेट्रोल पंपावर दादागिरी केल्याचा आरोप केला जात आहे. नाशिक जिल्ह्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाहन चालक आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यातील वाद टोकाला गेल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दोघांना समजवण्यासाठी गेलेल्या इतर पंप कर्मचाऱ्यांनाही वाहन चालकाने अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे. हेल्मेट शिवाय पेट्रोल दिल्यास पंप चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pandey) यांनी दिले आहेत, मात्र नवीन आदेशामुळे शहरात पेट्रोल पंपांवर गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
‘नो हेल्मेट नो पेट्रोल’वरुन अनेक दुचाकीस्वारांचे पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांशी खटके उडताना दिसत आहेत. विनाहेल्मेट पेट्रोल का दिले नाही, म्हणून नाशिकमध्ये बाईकस्वाराने पेट्रोल पंपावर गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
बाईक चालकाने पेट्रोल पंपावर दादागिरी केल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. बाईक चालक आणि पेट्रोल पंप कर्मचारी यांच्यात सुरु झालेला वाद काही मिनिटांत टोकाला गेला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. पेट्रोल पंपावरील राडा हा तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. दोघांना समजवण्यासाठी गेलेल्या इतर पंप कर्मचाऱ्यांनाही वाहन चालकाने अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, हेल्मेट शिवाय पेट्रोल दिल्यास पंप चालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश नुकतेच नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत. या आदेशामुळे पेट्रोल पंप कर्मचारी हेल्मेटची सक्ती करत आहेत, त्यामुळे पेट्रोल पंपांवर गोंधळ होताना दिसत आहे.
CCTV | विनाहेल्मेट पेट्रोल का दिले नाही, बाईक चालकाचा पंपावर राडा, कर्मचाऱ्यांशी बाचाबाची #Nashik #PetrolPump pic.twitter.com/CBK5EVvf6Y
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 9, 2022
संबंधित बातम्या :
पेट्रोल पंपावरून निघाले अन् भरधाव टेम्पोखाली सापडले, लातूर जिल्ह्यात भीषण अपघात, दोन ठार, एक जखमी
Video | बाटलीत डिझेल दिले नाही म्हणून पेट्रोलपंप कर्मचाऱ्याला मारहाण; पेव्हर ब्लॉक डोक्यात घातला
पेट्रोल न दिल्याच्या रागातून पेट्रल पंपाची तोडफोड; माजलगावमधील धक्कादायक घटना