Video : नाशिक अपघात : मामा भाच्याचा होरपळून मृत्यू! दोघेही चाकाखाली अडकले आणि…

| Updated on: Dec 09, 2022 | 9:36 AM

एसटी बस दुसऱ्या बसवर मागून धडकली आणि दोन्हीच्या मध्ये असलेल्या बाईकचा चक्काचूर, अकोले तालुक्यातील दोघांवर काळाचा घाला

Video : नाशिक अपघात : मामा भाच्याचा होरपळून मृत्यू! दोघेही चाकाखाली अडकले आणि...
भीषण अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अहमदनगर : नाशिक येथील शिंदे-पळसे इथं झालेल्या भीषण अपघातामध्ये अकोले तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे अकोले तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी अपघातात मामा आणि भाच्याचा जीव गेला. ते दोघेही जिवंत होरपळले. बसने मागून धडक दिल्याने दोघेही बसच्या चाकाखाली अडकले आणि बसने अचानक पेट घेतला. यावेळी त्यांना जीव वाचवण्यासाठी संधीही मिळाली नाही. मदन साबळे आण रवींद्र विसे अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ते अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील रहिवासी होते.

पुणे-राजगुरुनगर डेपोतून नाशिकच्या निशेने एक एसटी बस निघाली होती. नाशिक शहराच्या वेशीवर असताना या एसटी बसच्या चालकाचं नियंत्रण सुटलं. एसटी बसचे ब्रेकही निकामी झाली. दरम्यान, यावेळी ही एसटी बस थांब्यावर उभ्या असलेल्या दुसऱ्या बसवर पाठीमागून भरधाव वेगाने आदळली.

धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही बसच्या मध्ये असलेल्या दुचाकी या अपघातात भरडल्या गेल्या. तीन दुचाकीस्वारांना बसनं चिरडलं. यात दोघांचा जागीच जीव गेला. ही धडक इतकी जबर होती स्पार्किंग होऊन आग भडकली.

पाहा व्हिडीओ :

या आगीमध्ये दुचाकीही जळून खाक झाल्या. शिवाय एसटी बसचाही कोळसा झाला. मामा मदन साबळे आणि भाचा रवींद्र विसे हे दुचाकीवरुन जात असताना काळानं त्यांच्यावर घाला घातला.

पळसेगाव चौफुलीवर घडलेल्या या भीषण दुर्घटनेत दोघांचा जीव गेला असला तरी 43 जण अगदी थोडक्यात बचावले. तर 27 जण जखमी झालेत. अपघातानंतर आजूबाजूच्या लोकांनी एसटी बसमधील प्रवाशांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. तर दोघा दुचाकीस्वारांचा या दुर्घटनेत होरपळून दुर्दैवी अंत झाला.