नाशिक : नाशिकच्या येवल्यामध्ये (Nashik Murder News) झालेल्या अफगणिस्तानातील मुस्लिम नागरीकाच्या (Afghan Citizen shot dead in Yeola) हत्येनं खळबळ माजली आहे. या मुस्लिम नागरीकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेनं संपूर्ण नाशिक हादरलंय. आता या हत्याकांडप्रकरणी ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी महत्त्वपूर्ण खुलासा केलाय. आर्थिक व्यवहार आणि प्रॉपर्टीच्या वादातून हे हत्याकांड (Nashik Crime News) घडल्याची माहिती पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अहमद चिश्ती असं या अफगाण नागरिकाचं नाव आहे. अहमद चिश्तीच्या ड्रायव्हरनेच त्याचा खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासही करण्यात सुरुवात केलीय. वावी जवळ पुजा करुन गाडी बसत असताना अहमद चिश्ती यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्यानंतर मारेकऱ्यांनी पळ काढला.
अफगणा नागरिक अहमद चिश्तीच्या हत्याकाडं प्रकरणी मुख्य तीन आरोपी असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. येवल्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गोळ्या झाडल्यानंतर अहमद चिश्ती हा गाडी घेऊन फरार झालाय. सध्या त्याचा शोध सुरु आहे.
अहमद चिश्ती हा मूळचा अफगणिस्तानचा नागरीक आहे. तो रेफ्युजी म्हणून राहत होता. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या नावावर प्रॉपर्टी घेतली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. अहमद चिश्तीचं वय 35 वर्ष होतं. रात्रीच्या सुमारास पुजा झाल्यानंतर त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आर्थिक उलाढाली आणि प्रॉपर्टी व्यतिरीक्त याप्रकरणी दुसरा कोणताही एन्गल असण्याची शक्यता नाही, असं पोलिसांनी म्हटलंय.
सध्या पोलिसांनी आरोपींची शोध घेण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आहेत. फरार आरोपींनी लवकरात लवकर अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. भर रस्त्यातच झालेल्या या हत्याकांडाची माहिती मिळाल्यानंतर येवला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठलं होतं. त्यानंतर घटनास्ळी पंचनामाही करण्यात आला होता. कपाळात गोळी झाडत अहमद चिश्तीची हत्या करण्यात आली. यात तो जागीच ठार झाला होता.