नाशिक – मुंबईकडून (Mumbai) नाशिकच्या (Nashik) दिशेने किमान 50 प्रवाश्यांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसला वाडीवऱ्हे फाट्यावर आज पहाटे साडेपाच वाजता अपघात झाला. लक्झरी बसच्या (Bus) चालकाला अचानक झोप लागल्याने हा अपघात झाला आहे. भरधाव वेगामध्ये ही बस थेट वाडीवऱ्हे फाट्यावर असलेल्या पोलीस चौकीवर धडकली. घटनास्थळी ठिकाणी दिवसभर प्रवासी मोठ्या संख्येने असतात. पहाटे अपघात झाल्यामुळे मोठे विघ्न टळले असल्याचे नागरिक म्हणत आहेत. बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना किरकोळ मार लागला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 50 प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने सर्वजण बचावले. अपघातनंतर प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने नाशिक गाठले. बसचा चालक आणि क्लिन्नर पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
झोप लागल्याने बस पोलिस चौकीवर आदळली.
मुंबई-आग्रा महामार्गावर रोजच होणाऱ्या अपघातांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच आज पहाटे नर्मदा ट्रॅव्हलच्या MH 04 GP 9979 ह्या क्रमांकाच्या लक्झरी बसचालकाला झोप लागल्याने बस पोलिस चौकीवर आदळली. ह्या बसमध्ये किमान 50 जण प्रवास करत होते. ह्या सर्वांचा जीव बचावला आहे. बेजबाबदार बसचालक आणि क्लिन्नर यांनी हा अपघात होताच पलायन केले. वाडीवऱ्हे पोलिसांनी नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.
मिळेल त्या वाहनाने नाशिक गाठले
सुट्टीच्या दिवसात गावाकडे जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसेच खासगी बस मालक उन्हाळी सुट्टीच्या काळात अधिक पैसे घेत असल्याची ओरड प्रवासी करीत असतात. आज झालेल्या अपघातात सगळे प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
त्याचं ठिकाणी दिवसा अधिक प्रवासी असतात. सकाळी अपघात झाल्यानंतर अनेक प्रवाशांनी इतर गाड्यांनी आपलं घर गाठलं आहे.