लासलगाव (नाशिक) : काही घटना इतक्या विचित्र घडतात की ज्याचा आपण कधीच विचारही करु शकणार नाहीत. लासलगावात देखील तशीच काहिशी घटना घडली आहे. लासलगावात एका महिलेला दोन चोरट्यांनी पोलीस असल्याचं सांगून लुबाडलं आहे. चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील जवळपास साडेतीन लाखांचे दागिने लंपास केले आहेत. चोरट्यांनी महिलेला आधी पोलीस असल्याचं पटवून दिलं. त्यानंतर गोड बोलून सर्व दागिने पिशवीत भरण्यास सांगितलं. त्यानंतर दागिन्यांची पिशवी घेऊन चोरटे पसार झाले (thief behave as police and stolen jewellery in lasalgaon).
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात सर्वत्र अनलॉक होत असताना चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव येथे चोरीची वेगळीच घटना घडली आहे. लासलगावात दोन भामट्यांनी पोलीस असल्याचं बतावणी करुन साडेसात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. विशेष म्हणजे लासलगावातील रहदारी असणाऱ्या कोटमगाव रोडवरून चोरट्यांनी दागिने लुटले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेमुळे लासलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे (thief behave as police and stolen jewellery in lasalgaon).
लासलगाव येथील सुलोचना विजय कोचर या वयोवृद्ध 65 वर्षीय महिला घरातील कामानिमित्त बाहेर पडल्या होत्या. त्या कोटमगाव रोडवरील जाधव गॅस एजन्सीजवळ आल्या असता तिथे दुचाकीवरुन दोन जण आले. त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करुन महिलेला लुबाडलं. विशेष म्हणजे त्यांनी महिलेला पोलीस असल्याचं सांगितलं. याबाबत त्याने महिलेला पोलीस असल्याचंही पटवून दिलं. त्यानंतर त्याने महिलेला एका पिशवित सोन्याचे दागिने काढायला सांगितलं. त्यानंतर पिशवी हातात घेतली. नंतर तो पळून गेला.
चोरट्यांनी सर्वात आधी सुलोचना यांना रस्त्यावर अडवलं. त्यांनी सुलोचना यांना आपण पोलीस असल्याचं सांगितलं. त्यानंतर दोघांपैकी एक चोरटा महिलेसोबत बोलू लागला. “दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. याबाबत टीव्हीवरही दाखवलं जात असताना तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात सोने घालून घराबाहेर कशा पडल्या? तुमच्याकडे असलेल्या पिशवीत सोने काढून ठेवा”, असं एका चोरट्याने सांगितलं. पहिला चोरटा बोलत असताना लगेच त्याचा साथीदारही तिथे आला. त्याला पहिल्या व्यक्तीने हातातली अंगठी काढून खिशात ठेव सांगितलं. त्याने हातातली अंगठी काढून खिशात ठेवली. यावरुन महिलेला दोघं भामटे पोलीसच आहेत असा विश्वास पटला.
यानंतर दोघी चोरांनी महिलेला सर्व दागिने पिशवीत काढून ठेवायला सांगितले. चोरट्यांनी अंगावर दागिने बघितले तर ते चोरून नेतील, अशी भीती यावेळी दोघांनी महिलेला दाखवली. महिलेने सर्व दागिने पिशवीत काढले. महिलेच्या हातात चार बांगड्या होत्या. यापैकी एक बांगडी हातातून निघाली नाही. त्यामुळे महिलेने तीन बांगड्या आणि गळ्यातील मंगळसूत्र असं एकूण सव्वासात तोळे असलेला साडेतीन लाखांचा मुद्देमाल पिशवित काढून ठेवला. यावेळी एका चोराने चेक करण्याच्या बहाण्याने हातातून सोने घेतले. त्यानंतर ते सोनं घेऊन दोघं चोरटे दुचाकीवरुन पसार झाले.
या घटनेमुळे सुलोचना यांना धक्काच बसला. चोरटे त्यांच्या डोळ्यांसमोर दुचाकीवरुन त्यांचे सोने घेऊन पळून गेले. या घटनेनंतर सुलोचना यांनी लासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे लासलगाव पोलीस ठाण्यात अशीच एक तक्रार आली. भरवस फाटा येथे दतात्रेय कोळपकर यांची 3 ग्राम सोन्याची अंगठी रुमालात काढून ठेवा, असं सांगून चोरट्यांनी पळवून नेली. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा : धमकी, शिवीगाळ, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पुण्यातील भाजप नगरसेवकावर गुन्हा