इगतपुरी : पुढील वाहनाला ओव्हरटेक (Overtake) करताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वॅगनर कार पलटी (Car Overturned) होऊन तीन जण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना इगतपुरीमध्ये घडली. मुंबई आग्रा महामार्गावर पाडळी फाट्याजवळ आज दुपारी पावणेबारा वाजता हा अपघात झाला. उमेश आर. भट्टड (46), उल्हास एन. पारखी (50), अनिल विठ्ठल लोखंडे (45) सर्व राहणार नाशिक अशी गंभीर जखमींची नावे आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातांची संख्या पुन्हा वाढत असून महामार्ग प्राधिकरण विभागाकडून उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
सर्व जखमी आपल्या वॅगनर कारने नाशिकहून घोटीच्या दिशेने चालले होते. कार भरधाव वेगात चालली होती. कारचालक पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. या नादात त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार पलटी झाली. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने कारला मागून धडक दिली. या अपघातात कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसूचकता बाळगत अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.
समृद्धी महामार्गावर जालनाजवळ अपघात होऊन एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल सायंकाळी घडली. या अपघातामध्ये जानेफळ येथील सुनील निंबेकर, चंदू भाऊ सावळे हे गंभीर जखमी झाले आहेत. तर मेहकर येथील हॉटेल व्यवसायिक बळीराम खोकले यांचा मृत्यू झाला. अपघातातील व्यक्ती या हुंदाई कारने जालनावरून मेहकरकडे समृद्धी महामार्गावरून येत असताना कारचे टायर फुटल्यामुळे हा अपघात घडला, अशी प्राथमिक माहिती आहे. (Three persons were seriously injured when their car overturned near Igatpuri while overtaking)