नाशिक : इगतपुरी रेल्वे पोलीस स्टेशन (Igatpuri railway station) हद्दीत चालू रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांच्या मोबाईल व बॅग चोरीच्या (Mobile and bag stolen) घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावरून पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत वेगवेगळ्या ठिकाणाहून तीन संशयीतांना बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत लोहमार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरीस गेलेल्या मोबाईल पैकी ४ मोबाईल सायवर सेलकडुन ट्रेसिंग करुन इगतपुरी रेल्वे पोलीस ठाण्याच्या पथकामार्फत कौशल्यपूर्ण तपास करून संशयित आरोपी कडुन मुंबई, नाशिक, मालेगाव (Malegaon) येथुन आरोपीसह ताब्यात घेण्यात आले आहेत.
या प्रकरणाचा तपासा करणाऱ्या पथकाने इतर ०३ आरोपींना विविध गुन्ह्यात अटक करुन त्यांच्याकडुन ०४ मोबाईल १ लॅपटॉप, ०५ बॅगा जप्त केल्या आहेत. पथकाने इगतपुरी रेल्वे पोलीस स्थानकात दाखल असलेले नऊ गुन्हे उघडकीस आणले आहे. संशयित आरोपींवर कारवाई करत त्यांच्याकडून एकुण १,४०,१८९ /- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान लोहमार्ग पोलिसांच्या पथकाने इगतपुरी रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत रेल्वेतील प्रवाशांच्या बॅग व मोबाईलची चोरी करणाऱ्या संशयित आरोपींच्या नाशिक ,मालेगाव, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून तिघांच्या मुसक्या अवळल्या असून त्यांच्याकडून प्रवाशांच्या चोरी गेलेल्या वस्तू हस्तगत केल्या आहेत.
मागच्या कित्येक दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे प्रवासी चिंतेत होते. चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे ठरवले. त्यावेळी पोलिसांनी काही संशयित चेहरे दिसून आले. त्याची चौकशी केली असता त्यांच्याकडून पोलिसांना चोरीच्या अनेक वस्तू आढळून आल्या आहेत.