नाशिक: जिल्ह्यातील मनसेचे नेते नंदू शिंदे (Nandu Shinde)यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नंदू शिंदे यांच्या आत्महत्येमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नंदू शिंदे यांच्या आत्महत्येचं कारण समोर आलेलं नाही. नंदू शिंदे यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. (Nashik MNS leader Nandu Shinde Commit suicide by shot himself)
कामटवाडे येथील मनसे नेते नंदू शिंदे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी नंदू शिंदे यांच्या आत्महत्येचा तपास सुरु केला आहे. सटाणा साक्री रोडवर स्कोडा गाडीत बसून स्वतःवर गोळी झाडली.
आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
मनसेचे नेते नंदू शिंदे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. नंदू शिंदे यांच्या आत्महत्येची कारणं पोलीस तपासानंतर समोर येण्याची शक्यता आहे. नंदू शिंदे सटाणाहून नाशिककडे जात असताना त्यांनी गाडी स्कोडा गाडी रस्त्याच्या बाजूला थांबवली आणि गोळी झाडून घेत आत्महत्या केली. शिंदे यांच्या आत्महत्येमुळं राजकीय आणि व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
नंदू शिंदे यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरुन नंदू शिंदे यांनी ज्या बंदुकीतून गोळी झाडून घेतली ती ताब्यात घेतली आहे. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर शिंदे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टम करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. नंदू शिंदे हे राजकीय क्षेत्रासह उद्योजक म्हणून देखील परिचित होते. नंदू शिंदे यांच्या आत्महत्येपूर्वी नातेवाईकांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
Kisan Pension : शेतकऱ्यांसाठी लाभदायी आहे ही योजना, दरमहा 55 रुपये भरा आणि मिळवा 3000 रुपयेhttps://t.co/6euoHBkjwR#kisanpension |#beneficial |#farmers |#get |#pension
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 7, 2021
संंबंधित बातम्या:
अहमदनगरमध्ये पत्रकाराची दगडाने ठेचून हत्या, राहुरीत मृतदेह आढळला
परमवीर सिंगांच्या सूचनेने वाझेंकडे हायप्रोफाईल केसेस, नगराळेंच्या अहवालात धक्कादायक खुलासे
(Nashik MNS leader Nandu Shinde Commit suicide by shot himself)