कर्ज घेताना चार वेळा विचार करा, एजंट असेल तर नक्कीच करा; नाशिकमधील घटना समोर येताच पोलिसही चक्रावले!

| Updated on: Apr 27, 2023 | 7:00 PM

फायनान्स कंपनीच्या नावाचे मंजूरीचे पत्र देत ही फसवणूक झाल्याचे समोर आल्यानं पोलिस देखील चक्रावून गेले आहे. नाशिकच्या सिन्नर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कर्ज घेताना चार वेळा विचार करा, एजंट असेल तर नक्कीच करा; नाशिकमधील घटना समोर येताच पोलिसही चक्रावले!
करणीच्या संशयातून शेजाऱ्याने शेजाऱ्याला संपवले
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : खरंतर कर्ज देत असताना कुठलीही बँक सर्व कागदपत्रांची खातरजमा करत असते. त्यासाठी अनेक अधिकारी अनेकदा तुमची कागदपत्रे, तुमची पात्रता तपासून तुम्हाला कर्ज देण्याची प्रक्रिया पार पाडत असतात. त्यामुळे बँक त्यांच्या बाजूने सर्व बाजू तपासूनच तुमच्या खात्यात रक्कम किंवा तुम्हाला डिडी देत असते. अशी सर्व प्रक्रिया जवळपास ज्यांनी कर्ज घेतलं किंवा घेण्याचा प्रयत्न केला आहे अशा सर्वांना माहिती आहे. मात्र, दुसरीकडे कर्ज घेत असतांना तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामध्ये एजंट आणि बँकेचे अधिकारी देखील सहभागी असू शकतात. कदाचित हे वाचून तुम्हाला शंका निर्माण होऊ शकते. मात्र, हे खरं आहे. अशीच एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.

अधिक काळासाठी आणि ते देखील कमी व्याजदरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत तब्बल सहा लाख रुपये उकळवल्याचे समोर आले आहे. फायनान्स कंपनीच्या नावाचे मंजूरीचे पत्र देत ही फसवणूक झाल्याचे समोर आल्यानं पोलिस देखील चक्रावून गेले आहे.

नाशिकच्या सिन्नर येथील राजकीय व्यक्तीला हा चुना लावण्यात आला आहे. दिलीप रामराव शिंदे यांची सहा लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. सिन्नर एमआयडिसी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

दिलीप शिंदे हे सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे माजी अध्यक्ष आहेत. यशविए जिल्हा परिषदचे माजी सदस्या आहेत. दिलीप शिंदे यांनी चार जणांच्या विरोधात ही तक्रार दिली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिकच्या महात्मानगर येथे राहणारे मनोज वामन शिंदे, सर्वेश मनोज शिंदे आणि मुंबई येथे राहणारे युवराज हरीशकुमार वर्मा, सरताज मिर्झा या चौघांवर शिंदे यांनी आरोप केला आहे. ग्रामीण पोलिसांकडून याबाबतचा अधिकचा तपास सुरू आहे.

हॉटेलचा विस्तार करण्यासाठी शिदे यांनी कर्ज उपलब्ध होण्यासाठी प्रक्रिया केली होती. त्यामध्ये प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे. तीन वर्षभर ही सर्व प्रक्रिया सुरू होती.

तीन वर्षात अनेकदा कमी अधिक प्रमाणात रक्कम घेतले. मात्र, कर्ज उपलब्ध करून न दिल्याने शिंदे यांनी पोलिसांत धाव घेत फसवणुकीची तक्रार दिली आहे. त्यामुळे एजंट किंवा बँकेचे अधिकारी तुमची फसवणूक करू शकतात. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.