नाशिक : चोरी करण्यासाठी किंवा लूट करण्यासाठी चोरटे दररोज नवनवीन शक्कल लढवत असतात. त्यामध्ये अनेकदा जेष्ठ नागरिकांना चोरटे लक्ष करीत असतात. त्यामध्ये नुकताच नाशिकमध्ये असाच एक लुटीचा प्रकार समोर आला आहे. बँकेतून पैसे काढून बाहेर आलेल्या जेष्ठ नागरिकाची काही क्षणात रोकड लंपास केली आहे. यावेळी वापरलेली शक्कल आणि चोरीसाठी केलेली कृतीपाहून नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. बँकेच्या बाहेर अशी चोरी झाल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन बँकेसह पोलिस प्रशासनावर करण्याची वेळ आली आहे.
बोधले नगर येथील एका बँकेतून एका जेष्ठ नागरिकाने पावणेतीन लाख रुपयांची रोकड काढली होती. सोबत आणलेल्या बॅगमध्ये ही रोकड ठेऊन एक जेष्ठ नागरिक बँकेच्या पार्किंग मध्ये लावलेल्या दुचाकी जवळ आले. आणि दुचाकीच्या हँडलला बॅग अडकवली.
बॅग अडकवत गाडीवर बसणार तितक्याच तीन ते चार लोकं जेष्ठ नगरिकाच्या जवळ मदतीसाठी आले असे भासविले. तुमच्या गाडीच्या खाली बघा किती पैसे पडले आहे. तितक्यात एक जण बोलण्यात त्यांना गुंतवत असतांना दुसऱ्या बाजूने हँडल लावलेली बॅग लंपास केली.
विशेष म्हणजे बँकेतून बाहेर येणाऱ्या व्यक्तीवर पाळत ठेऊन आधीच त्यांच्या दुचाकीच्या खाली दहा वीस रुपयांच्या नोटा ते टाकून ठेवतात. विश्वास बळवण्यासाठी त्यांची ही कृती चांगलीच महागात पडू लागली आहे.
विशेष म्हणजे ज्या अशोक तोताराम पाटील यांची लूट झाली त्यावेळेला त्यांनी सोबत एका मित्राला सोबत आणले होते आणि तो मित्र देखील सोबत होता. त्यामुळे ही चोरीची घटना पोलिसांनी चक्रावून टाकणारी आहे.
अशोक पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही आणि केलेल्या वरणावरून पोलिस संशयित आरोपीचा शोध घेत आहे. त्यामुळे चोरीचा हा नवा फंडा अनेकांना धक्का देणारा आहे.