नाशिक : नाशिकच्या अंबड पोलिस ( Nashik Police ) ठाण्याच्या हद्दीत फ्लॅट विक्रीत सातबारा उताऱ्यावरील बोजा कायम ठेवून गंडा घातल्याचं प्रकरण ताजं असतांना आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अंबड पोलिस ठाण्यात नुकताच एक गुन्हा दाखल झाला असून तब्बल 24 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला असून त्यापूर्वी केलेल्या व्यवहाराच्या बाबी पाहून पोलिसही चक्रावले आहे. त्यामुळे फ्लॅट खरेदीच्या फसवणुकीचा हा फंडा ( Fraud Case ) अनेकांना धक्का देणारा असून अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिकचा तपास सुरू केला आहे.
प्रकरण नेमकं काय ?
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या फ्लॅटचे मालक असल्याचे सांगून व्यवहार केला. यामध्ये विमान कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगत व्यवहार केला होता. राणेनगर येथे इंडियन एअरलाइन्सचे जुने फ्लॅट आहेत. त्या फ्लॅटची विक्री करायची म्हणून व्यवहार केला. इसार पावतीही केली. इतकंच काय करारनामा केला. मात्र टायरल व्हेरीफीकेशन केल्यावर धक्कादायक बाब समोर आली.
संशयित आरोपी कोण ?
संजय गोसावी, भीमा वाघमारे, छाया आव्हाड, प्रशांत आव्हाड, आनंद भट्टड हे संशयित आरोपी असून त्याच्यावर अंबड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी विमान कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून व्यवहार करत 24 लाखांची फसवणूक केली. यामध्ये तीन जणांची फसवणूक झाली आहे.
कुणाची झाली फसवणूक ?
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मूळ रहिवाशी कैलास महाजन त्यांचे मावसभाऊ किरण बिरारी आणि संदीप बोरसे या तिघांची फसवणूक झाली आहे. फ्लॅटचा व्यवहार करत इसार पावती केली होती. त्यानंतर करारनामा ही केला. मात्र बँकेने टायटल व्हेरीफीकेशन मागणी केल्यावर त्याची पूर्तता करत असतांना फसवणूक झाल्याचे उघडकीस आले.
फ्लॅट खरेदी करतांना काय काळजी घ्याल?
फ्लॅट किंवा घर खरेदी करत असतांना सातबारा उतारा तपासून घ्यावा. टायटल व्हेरीफीकेशन करून घेणे. जुना सर्च रिपोर्ट बघून घ्यावा किंवा तो काढून एकदा तपासणी करून घ्याव्या. जागेच्या आणि इमारतीच्या नोंदी तलाठी कार्यालयातून एकदा तपासणी करून घ्याव्या.